देह व्यापार करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी अन्यथा परिणाम भारी ठरतील:विक्रमसिंह पाचपुते यांचा इशारा
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार ४ मार्च २०२६
श्रीगोंदा प्रतिनिधी:श्रीगोंदा तालुक्यातील रुईछत्तीसी येथील ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध डान्सबार आणि वेश्याव्यवसायाचा लज्जास्पद, बेशरमपण असणारा व्यवसाय हा कायद्यात न बसणारा व्यवसाय सुरू असल्याबाबत आमदार विक्रम पाचपुते यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला. या बेकायदेशीर प्रकारांमुळे गावातील मुला मुलींच्या शिक्षण संस्थेवर्ती परिणात्मक बदल होत आहे आणि समजतील असमतोल बिघडत आहे, हा नजरेच्या आडे देह ठेवून व्यश्या व्यवसाय गुन्हेगावृत्तीचा आहे .
कायद्याला भंग करणाऱ्यांवरती ताबोडतोब बंदोबस्त करावा. त्याच बरोबर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. आमदार यांनी नजरेत आणून दिले की, रुईछत्तीशी येथे ऑर्केस्ट्राचा परवाना घेऊन प्रत्यक्षरूपाने डान्सबार चालवले जात आहेत. हॉटेल आणि आर्केस्ट्राच्या आडे वेश्याव्यवसाय आणि नशेचा व्यवसाय होत आहे या कारणास्तव महिला आणि तरुणांमध्ये असुरक्षिततेची भिती निर्माण झाली आहे.
या अवैध धंद्यांविरोधात ८ व ९ फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांनी सामूहिक उपोषण केले होते. मात्र, उपोषण सुरू असतानाही संबंधित ठिकाणी हे व्यवसाय खुलाआम सुरू असणे ही बाब अत्यंत धक्कादायक आणि विस्मयकारक असल्याचे पाचपुते यांनी नमूद केले. “पोलीस दंडात्मक कृती वेळी संबंधित महिलांना कामगार दाखवून कायद्याच्या सुटकेचा मार्ग, शोधले जातात, हे थांबले पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय शहानिशा करून हमीदार व्यक्तींवर कडक कारवाई करावी,
तसेच गरज भासल्यास संबंधित कायद्यात सुधारणा करावी, अशी मागणी आमदार पाचपुते यांनी केली. अनेकदा अर्ज देऊनही काहीही कारवाई न झाल्याने ती एक शासकीय उदासीनता ठरली आहे.” ग्रामस्थांमध्ये असंतोषाची लाट वाढेल ज्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची सरकारला विनवणी सह जोरदार विरोधाचे संकेत दिले आहे.
पोलिस कारवाई वेळी हेराफेरी : पोलिस कर्मचारी यांच्याकडून टोलवाटोलवीची उत्तरे कायमचेच, गुन्हेगार नसून कामगार म्हणून केला तपास उलट दोषींना दिली सूट.होतो कारवाईला विसर, आमदार यांचे वक्तव्य विधानसभेत आरोप
🔴🟢🟠🟣
