श्रीगोंदा तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” अभियान टप्पा-१
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार ३ मार्च २०२६
श्रीगोंदा (प्रतिनिधी): महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या आदेशानुसार मार्च ते मे २०२६ या कालावधीत “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” अभियान टप्पा-१ राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यातील ११ महसूल मंडळांमध्ये मंडळस्तरावर एकदिवसीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार श्रीगोंदा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
७ मार्च २०२६ – काष्टी (राजयोग मंगल कार्यालय)
१६ मार्च २०२६ – चिमणगाव (श्री. हंगेश्वर मंदिर, हंगेवाडी)
२० मार्च २०२६ – पेडगाव (दत्त मंदिर सभागृह)
२७ मार्च २०२६ – आढळगाव (श्री. सिद्धेश्वर देवस्थान)
२ एप्रिल २०२६ – बेलवंडी बु. (श्री. छत्रपती विद्यालय हॉल)
१० एप्रिल २०२६ – देवदैठण (महादेव मंदिर)
१७ एप्रिल २०२६ – लोणी व्यंकनाथ (जिजाई मंगल कार्यालय)
२१ एप्रिल २०२६ – मांदवगण (श्री. संत सावतमाळी मंदिर सभागृह)
२३ एप्रिल २०२६ – भानगाव (श्री. भानेश्वर महादेव मंदिर)
८ मे २०२६ – श्रीगोंदा (तुळजाईदास मंगल कार्यालय)
१३ मे २०२६ – कोळगाव (सैनिक सांस्कृतिक भवन – वीर भवन)
शिबिरामध्ये उपलब्ध सेवा
१) प्रलंबित फेरफार निकाली काढणे
मंडळ स्तरावर प्रलंबित व वादग्रस्त फेरफार प्रकरणांची सुनावणी घेऊन तत्काळ निकाली काढण्यात येणार आहे.
२) अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क
७/१२ मधील चुका दुरुस्तीसाठी अर्ज स्वीकारणे, कागदपत्रांची तपासणी, त्रुटी सूची देणे तसेच डिजिटल ७/१२ व ८अ उतारे तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
३) लोकसेवा हक्क कायद्यानुसार तत्काळ सेवा
उत्पन्न, रहिवासी/अधिवास, जात, नॉन-क्रीमिलियर आदी प्रमाणपत्रांसाठी अर्ज स्वीकृती व वितरण.
४) अकृषिक रूपांतरणाबाबत मार्गदर्शन
जिल्हाधिकारी परवानगीतील बदल, सनद प्रक्रियेतील सुधारणा व एकरकमी अधिभार भरण्याच्या नव्या व्यवस्थेबाबत माहिती दिली जाईल.
५) डिजिटल ७/१२ बाबत जनजागृती
महाभूमी पोर्टलवरून डाउनलोड केलेल्या डिजिटल ७/१२ उताऱ्याला कायदेशीर वैधता प्राप्त झाल्याने नागरिकांना डिजिटल सेवेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.
६) भूसंपादन व अकृषिक प्रकरणे
कमी-जास्त पत्रके तयार करून गाव नकाशे व नोंदी अद्ययावत करण्याची कार्यवाही शिबिरादरम्यान केली जाईल.
‘सिंगल विंडो’ प्रणालीची अंमलबजावणी
शिबिरात एकाच ठिकाणी तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित राहून ‘सिंगल विंडो क्लिअरन्स’ पद्धतीने अर्ज स्वीकृती, प्रक्रिया व तात्काळ निकाल देण्यावर भर राहणार आहे.
इतर सुविधा
ई-मोजणी, अॅग्रिस्टॅक, पीकविमा, पीएम किसान, तक्रार निवारण यासंदर्भात मार्गदर्शन व प्रलंबित प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे.
तरी श्रीगोंदा तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या संबंधित मंडळातील शिबिरास उपस्थित राहून विविध महसूल सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालय श्रीगोंदा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
🔴🟢🟠🟣
