महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या जिल्हा सह-प्रसिद्धी प्रमुख पदी गौरव घोडके यांची नियुक्ती
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार, ८ मार्च २०२६
अहिल्यानगर (प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीमध्ये महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाच्या जिल्हा प्रसिद्धी विभागाच्या सह-प्रसिद्धी प्रमुख पदी युवा क्रीडा मार्गदर्शक गौरव घोडके यांची निवड करण्यात आली आहे.
शारीरिक शिक्षण प्रमुख स्वप्नील वारुळे सर यांच्या विशेष उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली. गौरव घोडके यांचा क्रीडा क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि मार्शल आर्ट्समधील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शारीरिक शिक्षण शिक्षकांचे प्रश्न मांडणे आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवणे, हा या नियुक्तीचा मुख्य उद्देश आहे.
या निवडीबद्दल बोलताना स्वप्नील वारुळे सर म्हणाले की, “गौरव घोडके यांच्यासारख्या उत्साही आणि कार्यक्षम युवकाच्या निवडीमुळे संघटनेच्या प्रसिद्धी कामाला मोठी गती मिळेल. क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रम जनमानसात पोहोचवण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.”
आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना गौरव घोडके यांनी संघटनेचे आणि सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांचे आभार मानले. “दिलेली जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेन आणि शारीरिक शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन,” असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
या निवडीचे क्रीडा शिक्षक, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आणि खेळाडूंनी स्वागत केले असून गौरव घोडके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
🔴🟢🟠🟣
