स्टुडंट्सकडून बाईकचा पाठलाग; जोरदार धडक देऊन अपघात
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार ९ मार्च २०२६
श्रीगोंदा शहरातील दौंड जामखेड रोड लगत असणारे महाराजा जिवाजीराव शिंदे व छत्रपती कॉलेज मधील काही विद्यार्थी दुश्मनी धरत एकमेकांनमध्ये गाडीची जोरदार धडक दिली.हि दुश्मनी आपसी वादातून घडली आहे.अनेक विद्यार्थी गाडीचा पाठलाग करून गाडीला आडवी उभा करून पकडण्याच्या हेतूने गाडी गाडीवरती चढवली आणि गाडी खाली कोसळली.दुसऱ्या विद्यार्थी जीव मुठीत धरून गाडी आगेकूच करताना दिसला.मुलाने मरण्याच्या भीतीने गाडी पुढे धावण्यासाठी अतोनात प्रयत्न केला.पण पाठलाग करणारी गाडी जास्त सी सी असल्या कारणाने पुढील गाडीला ओवरटेक करत गाडी वरती हल्ला चढवला.
हल्ला चढवत गाडीवर हल्ला चढवल्याची घटना समोर आली.या घटनेत विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागला आहे. जास्त वेगात गाडीला ठोस दिल्याने चालक रस्त्यावर कोसळून रस्त्यावर आपटला होता. ही मुले श्रीगोंदा शहरातील कॉलेज मधील असल्याचे समजले.हा कॉलेज स्टुडंट्स आता दुश्मनी पाई खुन्नस बसल्यामुळे रागा वैतागाने एकमेकांना मारण्यावर उतरले होते. हि घटना शेंडगेवडी चारी लगत घडली. वेळ दुपारची १.४५ असून थरारक अपघात घडला आहे.
या मध्ये मुलाच्या डोक्यात मार बसून रक्ताच्या धारा वाहत होत्या मुलगा भीतीने घाबरत होता. आणि मुलांची जणू फौज मागे धावत होती. मुलांना भीतीचे सावट अजिबात चेहऱ्यावरती दिसत नव्हते तर खूंनशीचा बदला डोळ्यात जाणवत होता. एकमेकांचा जणू जीव घेण्यासाठी गाडी रेस मध्ये धावतानी दिसून आली.
अपघात गाडी: मोटर वाहन एच एफ डिलक्स
सूचना:१८ वर्षाखालील मुलांच्या हातात गाडी देऊ नये.
सूचनेचा आधार: मोटर वाहन लायसन्स नियमांचे उल्लघन करण्यात आले आहे.
बातमी बनविण्याचा आधार:बातमी बनविणारा घटनास्थळी उपस्थित होता.
🔴🟢🟠🟣
