साई सेवा पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार ८ एप्रिल २०२६
मालमत्ता खरेदी विक्रीमधुन फसवणुकी पासुन सावध रहा.
💎महाराष्ट्र प्रतिनिधी- शिवाजी खोमणे💎
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील साई सेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित तसेच साई सेवा मल्टिस्टेट या दोन्ही शाखेच्या आर्थिक व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सहकार विभागाने जाहीर निवेदनाद्वारे या पतसंस्थेतील आर्थिक गैर व्यवहारांबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ अन्वये चौकशी सुरू आहे.
या प्रक्रियेत संस्थेचे संचालक अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर आर्थिक जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या संस्थेच्या सर्व व्यवहारांवर बंधने आणण्यात आले आहेत ही संपूर्ण कारवाई पुणे येथील सहकार आयुक्त व निबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे .चौकशी सुरू असतानी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तसेच संचालक मंडळासोबत कुठल्याही प्रकारचे खरेदी विक्रीचे व्यवहार करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच कुठल्याही प्रकारचे गहाण खत, बक्षीस पत्र तारण तसेच आर्थिक व्यवहार किवा साठेखत करू नये तसे झाल्यास सदरचे व्यवहार वसुलीचे मर्यादेपर्यंत चौकशी अधिकाऱ्यांवर बांधणकारक राहणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी. फसवणूक झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही याची नोंद घेवूनच व्यवहार करावे.
🟣🔴🟢🟠
