साई सेवा पतसंस्थेचा महत्त्वाचा दस्त ऐवज संगनमताने लंपास
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार,९ एप्रिल २०२६
महाराष्ट्र प्रतिनिधी- शिवाजी खोमणे
कुंपणच शेत खातय ….
का ष्टी : श्रीगोंदा तालुक्यातील साई सेवा पतसंस्थेत व्यवहारात अनियमितता आढळून आली आहे त्या संदर्भात सहकार आयुक्त तसेच जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांच्या मार्फत चौकशी चालू आहे, या संस्थेच्या काष्टी येथील मेन शाखेतून महत्त्वाचा दस्त ऐवज एका संचालकाने संबंधित अधिकाऱ्या शी संगनमत करून स्ट्रॉंग रुम उघडून त्यातील महत्त्वाचा दस्त ऐवज व सन २०२१ ते २०२६ या आर्थिक वर्षाचे इतिवृत्त पुस्तके तसेच तत्सम कागद पत्रे गायब केल्याची घटना घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की सदर कागदपत्रे दिनाक १४ जानेवारी २०२६ या दिवशी संबंधित संचालकाने सकाळी १० वाजता काष्टी येथील मेन शाखेत उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्याला घेऊन स्ट्रॉंग रूम उघडण्यास सांगितले त्या कर्मचाऱ्याचा नाइलाज झाला होता.
यावेळी या संचालकाने त्याच्या उपस्थिती मधे इतिवृत्त पुस्तके तसेच तत्सम कागद पत्रे विना परवानगी सचिव नसताना घेवून गेल्याची घटना घडली आहे.
या बातमी मुळे ठेवीदार आज दिनाक ८ एप्रिल २०२६ रोजी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले या विषयी संबधित संचालकाला संपर्क केला असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. संबंधित संचालकाचे दस्त ऐवज घेवून जाताना चे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहेत या वेळी प्रशासनाने संबंधित संचालकावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी ठेवीदारांनी केली आहे
यावेळी सचिव गणेश डोईफोडे याना संपर्क केला असता त्यांनी संबंधित संचालकास २ महिन्यापासून पत्र व्यवहार केल्याचे सांगितले.तालुक्यात वेगवेगळ्या चर्च्याना उधाण आले होते त्यामुळे आज मेन शाखेच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते.
सहाय्यक निबंधक याना संपर्क केला असता त्यांनीही या गोष्टी ची माहिती घेतो असे सांगून वेळ मारून नेली त्यामुळे ठेवीदारांमध्ये एकच चर्च्या रंगली होती की कुपणच शेत खातय त्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
🟣🔴🟢🟠
