महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; १० आणि ११ मे रोजी अनेक जिल्ह्यांत जोरदार सरींची शक्यता
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार ७ मे २०२६
महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या तडाख्यानंतर आता हवामानात मोठा बदल होत असून राज्यातील अनेक भागांत पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या नद्या-नाल्यांना पुन्हा पाण्याचा प्रवाह मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामानातील बदलामुळे समुद्राकडून महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने वारे वाहू लागले असून त्याचा परिणाम म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यांत मे महिन्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे संकेत आहेत.
बीड, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, अकोला, रत्नागिरी आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत तुलनेने अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
१० आणि ११ मे रोजी अनेक भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात. १२ मे रोजी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज असून, १५ मे रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. पुढील काळात २५ मेपर्यंत हवामानात चढ-उतार कायम राहू शकतात.
सुरुवातीला जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कांदा काढणी, मका, बाजरी तसेच इतर पिकांचे नुकसान टाळण्यासाठी वेळेत काढणी करावी. धान्य आणि शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच पिकांना पावसापासून संरक्षण देण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.
धोका:विजेचे खांब पाऊस वाऱ्यात पडले जातील
शेतकऱ्यांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन सतर्क राहण्याची गरज आहे.
हवामान अंदाज दर्शविणारे – मुख्य संपादक वैभव हराळ
संभाव्य पावसाचे दिवस : १० आणि ११ मे
