तांदळी दुमाला निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत चौकशीची मागणी पत्रकार वैभव हराळ
श्रीगोंदा | प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला गावात विविध विकासकामांना मोठ्या प्रमाणात मंजुरी मिळाल्याचे सांगितले जात आहे. आमदार Vikram Singh Pachpute यांच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये विकासकामे दिली जात असली तरी तांदळी दुमाला येथील काही कामांच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गावातील रस्ते, घरकुल योजना, संडास-बाथरूम आदी कामे अल्प प्रमाणात झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः तांदळी ते बोस वस्ती ते वाघजाई परिसरातील डांबरी रस्त्याच्या कामावर ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित रस्त्याचे काम नेमक्या कोणत्या दर्जाने आणि निकषांनुसार सुरू आहे, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठेकेदार कामे पूर्ण झाल्याचे दाखवून बिले काढत आहेत. मात्र प्रत्यक्षात कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
कामांमध्ये अनेक त्रुटी दिसून येत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून मंजुरी व सही केली जात असल्याने भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त केला जात आहे. काही ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
ग्रामस्थांचा सवाल आहे की, विकासाच्या नावाखाली निकृष्ट कामे करून शासकीय निधीचा अपव्यय होत असेल तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
कामातील त्रुटी: दिलेल्या डांबरी रस्ता मधील जाडी रुंदी तसेच डांबरी चिकट बसत नाही
ग्रामपंचायत अधिकारी पाहणी करत नसल्याबाबत तक्रार
नियम: भ्रष्ट्राचार असल्यास सरपंच ग्रामस्थ असो किंवा अधिकारी यांवर कारवाई करणे योग्य
कामातील त्रुटी खडी आणि डांबरीजडित कमी वापर केला.
पायाभूत कामातील मटेरियल कमी
विरोध पत्रकार वैभव हराळ
शासनाने दिलेल्या माहितीनुसार कामे हि टेंडर नुसार हवीत तसे न होता निकृष्ट दर्जाचे काम आहेत. कामातील मटेरियल कमी आणि अल्प प्रमाणात आहेत तसेच पत्रकार या पदानुसार मी काम बंद करत आहे. नियमांचे उल्लघन करणारे राजकीय नेते नकोत.
🟣🔴🟢🟠
