महाराजा कॉलेजच्या कबड्डीपटूंची मुंबई पोलीस दलात निवड; महाविद्यालयाचा गौरव
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा | प्रतिनिधी
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील गुणी व उत्कृष्ट कबड्डी खेळाडू तुषार रामदास भोसले (रा. सिद्धटेक) व स्वप्नील नानासाहेब चौधरी (रा. अजुनज) यांची मुंबई महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झाली आहे. या यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुषार भोसले व स्वप्नील चौधरी हे दोघेही शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
दोन्ही खेळाडूंच्या निवडीबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. बबनराव पाचपुते, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. बाबासाहेब भोस, मा. आ. राहुल जगताप, सदस्य मा. महावीर पाठवा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, सिनिअर उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, ज्युनिअर उपप्राचार्य प्रा. श्रीकांत थोरात, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे, विभाग प्रमुख प्रा. उषा बोरुडे, प्रा. विजय मगर, प्रा. संदीप दरेकर, जिमखाना चेअरमन प्रा. रमेश थोरात तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी तुषार व स्वप्नील यांना कोच मुकेश जाधव, क्रीडा शिक्षक प्रा. संजय डफळ आणि क्रीडा संचालिका कल्पना बागुल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच या दोन्ही खेळाडूंना यशाचे शिखर गाठता आले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
