दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी चिंतेत; शासनाने तातडीने मदत जाहीर करावी – शेतकऱ्यांची मागणी
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार २१ जून २०२६
मुख्य संपादक: वैभव हराळ
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी लावलेली नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागत असून शेतातील पिकांना पाण्याची तीव्र गरज भासत आहे. अनेक ठिकाणी जलसाठे कमी होत चालले असून काही ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
पावसाचा विलंब होत असल्याने शेतातील पिकांचे शेंडे करपण्यास सुरुवात झाली असून उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, पाळीव दुग्धजनावरांसाठी पिण्याचे पाणी व हिरवा चारा यांचीही कमतरता जाणवत असल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत. या साठी चारा डेपो उपलब्ध करण्यात यावा.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचे तातडीने सर्वेक्षण करावे व प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या मदत उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. नुकसानग्रस्त भागांतील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी दुष्काळी अनुदान जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, हवामानाचा अभ्यास करून वैभव हराळ यांनी २४, २६ आणि २७ जून २०२६ रोजी राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पुणे, सोलापूर, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, रत्नागिरी, धुळे, जळगाव आणि वर्धा या जिल्ह्यांसह काही भागांत पावसाची हजेरी लागू शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
🟠🟢🔴🟣
