किरण शिंदे यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस भूमिका बजावली; आरोपांबाबत पुराव्यांची गरज
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार, २१ जून २०२६
श्रीगोंदा : श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण शिंदे यांनी कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध कारवाया केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करून त्यांचा निपटारा करण्यात आला. तसेच विविध गुन्हेगारी प्रवृत्ती आणि बेकायदेशीर कृत्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जाते.
दरम्यान, त्यांच्या बदलीनंतर काही राजकीय आणि सामाजिक स्तरांवर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले असले, तरी कोणतेही आरोप करताना ठोस पुरावे आणि अधिकृत माहितीच्या आधारेच भूमिका मांडली जावी, असे मत व्यक्त होत आहे.
पत्रकार वैभव हराळ यांनीही कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यावर आरोप करताना वस्तुनिष्ठ पुरावे सादर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी कायदेशीर प्रक्रिया, न्यायालयीन निर्देश आणि अधिकृत चौकशी अहवालांच्या आधारेच मतप्रदर्शन व्हावे, असे सांगितले.
श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील स्वच्छता, शिस्त आणि प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्यासाठी किरण शिंदे यांनी प्रयत्न केल्याचे काही नागरिकांचे मत आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्ह्यांची चौकशी पूर्ण करून संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आली.
गुटखा प्रकरणासह इतर काही घटनांबाबत करण्यात आलेले आरोप हे संबंधित तपास यंत्रणा आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच निश्चित होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्ती किंवा अधिकाऱ्याबाबत निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.
पुरावे सापडल्यास मी पण केंद्रीय पत्रकार निवृत्ती घेतली समजा
मुख्य संपादक: वैभव हराळ
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
टिळक बोस यांनी पुरावे सादर करून वक्तव्य करावे अन्यथा मी पत्रकार वैभव हराळ कारवाई साठी सज्ज आहे. जी सजा न्यायालय देईल ती मी भोगान
न्यायालय पुरावे मागते.
जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत माता की
🟣🟠🟢🔴
