RBI old notes ban : अरे देवा! पुन्हा एकदा नोटबंदी? ‘महात्मा गांधी’ मालिकेतील नोटांवर RBI चा मोठा निर्णय; बँकिंग क्षेत्रात खळबळ
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार २७ जून २०२६
देशभरात ‘छुप्या नोटबंदी’ची चर्चा!
2005 पूर्वीच्या नोटा टप्प्याटप्प्याने चलनातून बाद करण्याचा RBIचा निर्णय
बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ
Reserve Bank of India News Marathi : काय सांगता… भारतात पुन्हा एकदा नोटाबंदीचा निर्णय होत आहे…अगदी बरोबर ऐकलं तुम्ही… देशभरातली नागरिकांसाठी आर्थिक व्यवहारांशी संबंधित एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर येत असून, रिझर्व्ह बँकेने 2005 सालापूर्वी छापण्यात आलेल्या महात्मा गांधी मालिकेतील जुन्या चलनी नोटा टप्प्याटप्प्याने चलनातून बाद करण्याच निर्णय घेतला आहे.
या रिपोर्टमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या एका परिपत्रकाचा हवाला देण्यात आला होता, ज्यात म्हटले होते की बँकेने ३० जूननंतर ₹१०, ₹२०, ₹५० आणि ₹१०० च्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत असा आदेश दिला आहे. या रिपोर्टमुळे खळबळ उडाली आणि आणखी एका नोटाबंदीचे गुपचूप नियोजन केले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला.
Forex Reserve: जून संपतानाच देशाच्या फॉरेक्स रिझर्व्हवर आनंदाची बातमी! 6,35,04,61,65,00,000 कोटी डॉलरवर पोहचला आकडा
दरम्यान ९ जून २०२६ रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशभरातील सर्व बँकांना एक परिपत्रक जारी करून स्पष्ट केले की, १ जुलै २०२६ पासून, नियमित बँकांमध्ये २००५ पूर्वी छापलेल्या नोटा स्वीकारणे किंवा बदलून घेणे बंद केले जाईल. त्यानंतर, या जुन्या नोटा बदलून घेण्याची सुविधा केवळ आरबीआयच्या देशभरातील १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये उपलब्ध असेल. आरबीआयच्या आदेशानंतर, देशभरातील विविध बँकांनी तात्काळ ही प्रक्रिया सुरू केली आहे. १२ जून २०२६ रोजी, बँक ऑफ महाराष्ट्राने पुण्यातील आपल्या मुख्य कार्यालयातून एक अंतर्गत परिपत्रक जारी करून, २००५ पूर्वी छापलेल्या नोटांसंदर्भात सर्व शाखा, प्रादेशिक कार्यालये आणि करन्सी चेस्ट्सना कडक सूचना दिल्या आहेत.
या सूचनांनुसार, कोणत्याही परिस्थितीत २००५ पूर्वी छापलेल्या जुन्या नोटा एटीएम किंवा बँक काउंटरद्वारे ग्राहकांना पुन्हा वितरित केल्या जाणार नाहीत. यामुळे, वित्तीय क्षेत्रात या निर्णयाकडे टप्प्याटप्प्याने लागू होणारी आणखी एक “अप्रत्यक्ष नोटाबंदी” म्हणून पाहिले जात आहे.
आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे पालन करण्याची आणि चलनी नोटांच्या सुरक्षा वैशिष्ट्यांचे आधुनिकीकरण करण्याची गरज असल्याचे कारण आरबीआयने या निर्णयामागे दिले आहे. जुन्या नोटांमधील सुरक्षा वैशिष्ट्ये आता कालबाह्य झाली आहेत आणि म्हणूनच त्या टप्प्याटप्प्याने काढून टाकल्या जात आहेत. १९९६ मध्ये भारतात सर्व मूल्यांच्या नोटांवर महात्मा गांधींचे चित्र असलेली ‘महात्मा गांधी मालिका’ प्रथम सादर करण्यात आली होती. २०१६ च्या नोटाबंदीनंतर, केंद्र सरकारने आणि आरबीआयने नवीन डिझाइन, नवीन रंग आणि वेगळ्या आकाराच्या ‘महात्मा गांधी नवीन मालिका’ नोटा जारी केल्या.
सामान्य नागरिकांना जुन्या आणि नवीन नोटांमधील फरक सहजपणे समजावा यासाठी आरबीआयने महत्त्वाची माहितीही दिली आहे. २००५ नंतर छापलेल्या सर्व नोटांच्या मागील बाजूस खाली छपाईचे वर्ष स्पष्टपणे नमूद केलेले असते. आरबीआयच्या या निर्णयानंतर, लाखो लोकांकडे असलेल्या जुन्या नोटांबाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि येत्या काही दिवसांत देशभरात या विषयावर व्यापक चर्चा होण्याची शक्यता आहे.
नियम लागू:महाराष्ट्र पत्रकार संघटनेचा केंद्र बिंदू वैभव हराळ आहे. सर्व भ्रष्टाचारी नेते, सर्व पत्रकार बांधवांना सक्तीचे आव्हान, माझे भारतीय राज्य घटनेतील नियम पाहून बातमी करावी अन्यथा पत्रकार नेते, आणि अधिकारी यांन वर कारवाई संबंधित सूचना जारी
🟣🟠🟢🔴
