साई सेवा पतसंस्थेच्या संचालक मंडळावर अखेर MPID कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
श्रीगोंदा, 3 जुलै 2026
भारत प्रतिनिधी : नाहीद पठाण
गुन्हा दाखल होताच सर्व संचालक मंडळ याना वाढीव कलम लावण्यात आलेची नोटीस बजावण्यात आली
साईसेवा ग्रामीण पतसंस्था व साई सेवा मल्टिस्टेट लि च्या सर्व ठेवीदारान मध्ये समाधानाचे वातावरण
साईसेवा सेवा पतसंस्था आर्थिक घोटाळा प्रकरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. या कथीत प्रकरणात कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे या प्रकरणी काही ठेवीदारांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती
ठेवीदार आक्रमक झाल्याने श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री ठेंगे साहेब यांनी सदर गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला होता यातील दाखल प्रकरणातील दोषी संचालक मंडळाची यादी पुढील प्रमाणे आहे
१)माऊली ज्ञानदेव पाचपुते (चेअरमन )
२)उत्तम वसंतराव मोरे (व्हा चेअरमन )
३)मोहन ज्ञानदेव धगाटे
४)अशोक तुकाराम भोसले
५)गोकुळ अरुण कंदलकर
६)चंद्रशेखर पोपटराव काळे
७)भगवानराव नारायणराव सोनवणे
८)सुनंदा अरुण डोईफोडे
९)जालिंदर सोनबा पाचपुते
१०)संतोष नारायण जाधव
११)चंद्रशेखर शिवाजीराव मोरे
१२)किरण नीलकंठ कुलकर्णी
१३)सुनीता भानुदास बांदल
१४)तारामती नाना सुपनर
१५)नाना मारुती सुपनर
१६)सुभद्रा नारायण जाधव
१७)सुनीता बाळासाहेब काळे
१८)गणेश अरुण डोइफोडे (सचिव )
१९)संतोष जयसिंग जगताप
२०)राहुल बाबुराव जगताप
२१) बाळासाहेब शंभुदेव पाचपुते
या आरोपीना श्रीगोंदा पोलिस याना १३ जुलै २०२६ पर्यंत ततत्काळ अटक करणार का ? असा प्रश्न ठेवीदारांनी उपस्थित केला आहे. बी एन एस ३१६(२ ), ३१६(४), ३१६(५ ), बी एन एस ३१८ (४)
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ ,
बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ चे कलम (३) व (५) व (२३) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता
गुन्हा वर्ग होताच मोठ्या संख्येने ठेवीदार यांनी जबाब दिले
साई सेवा बचाव कृती समितीने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कडे धाव घेत त्यांच्या दालनात जाऊन आपल्या तक्रारी मांडून एमपीआयडी कलम लावण्यात यावे तसेच विशेष लक्ष देण्याची मागणी केली त्या वेळी पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी तत्काळ ठेवीदारांची मागणी लक्षात घेऊन आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला सूचना देऊन महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे सरक्षण अधिनियम १९९९ चे कलम (३) हे वाढीव कलम लावण्यात आले त्यामुळे ठेवीदारण मध्ये समाधानाचे वातावरण झाले आहे तसेच आदेश होताच ठेवीदारांनी पोलिस अधीक्षक यांचे आभार मानले यावेळी निवेदन देताना सारंग पाचपुते, शिवाजी खोमणे, सुधीर भोईटे,शुभम पानसरे,महेश भोसले, नवनाथ दांडेकर प्रियांका वाघमारे आदि ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते
🟣🟠🟢🔴
