तांदळी दुमाला मधील व्यावसायिक अतिक्रमण हटवावे अन्यथा कर वसूल कारवी
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
१४ जुलै २०२६
तांदळी दुमाला येथील काही ग्रामस्थांची वाहनाची श्री तांदळेश्वर मंदिर चौकात आणि इतर चौकामध्ये वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहनांना प्रवेश करताना अनेक वेळ अडकून पडावे लागत आहे.हि जागा ग्रामपंचायत अधिकारात असल्याने कोणतीही पावती फाडली जात नाही आहे. तसेच कुठलाही निधी ग्रामपंचायत ला मिळत नाही.
गावात शांतता निर्माण ठेवण्यासही व्यवसायिकांनी टपरी दुकाने हि स्व मालकीच्या जागेत चालू ठेवावेत अन्यथा या सर्व व्यावसायिक मालकांनी ग्रामपंचायत जागा भाडे पट्टी फाडली जावी अशी इच्छा तांदळी दुमाला येथील मुबलक ग्रामस्थांची आहे. इतर कोणतंही फायदा आणि निधी हा शासनास मिळत नसून निधी मागणी साठी तांदळी गावचे सरपंच उप सरपंच निवेदन देण्यात येत असते. अशा भाडेपट्टीत वाढ झाल्याने.
ग्रामपंचायत वसुली दिसून आल्यास गावचा विकासासाठी मार्ग मोकळा होऊ शकतो. शासनास जास्त कर ज्या ग्रामपंचायतीचा मिळतो अशा ग्रामपंचायतीस गावातील रोड, आणि इतर कामास निधी उपलब्ध होण्यास मदत होते. जास्तीत जास्त निधी शासन मंजूर करते. तरी तांदळी ग्रामपंचायत यांनी सर्व गावातील चौकातील व्यावसायिकांकडून पैसे वसूल करावेत. अन्यथा हे अनधिकृत जागेतील दुकाने काढून टाकावीत. हे शासन निर्णय नियमाच्या विरोधात आहे.
पंचायत समिती सहाय्यक अधिकारी यांना सूचना: तांदळी ग्रामपंचायत पाहणी करण्यात यावी
केंद्रीय पत्रकार वैभव हराळ
🟣🟠🟢🔴
