अहिल्यानगर बनले अपघाताचे केंद्रस्थान श्रीगोंदा मृत्यूची नोंद
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार २८ फेब्रुवारी २०२६
चालक आता रस्त्यावरील गाडी हवेतच ठेवत असल्याने अपघात वाढत आहेत.अहिल्यानगर जिल्हा अपघाताचे केंद्रस्थान झाला तर श्रीगोंदा तालुक्यात मृत्यूची नोंद करण्यात येत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मोटर गाडीच्या वेगावरती ताबा नसल्याने आणि अनेक अपघाता होऊ लागले आहेत.अशा बेभान वेगाने मोटर गाडी थांबा बसत नाही आणि दुर्दैवाने नव्हे तर आपल्याच गाडीच्या वेगाने अवक्या बाहेर होत आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग झाल्याने रस्त्यातील समतोल ठेवल्याने रस्ता हा रुंदीचा झालेला आहे. रस्ता सपाटीचा आणि जास्त अडथळे नसल्याने गाडीला आणि वाहन चालक यांना वेगाचे भान राहिलेले नाही आहे.
अती वेगाने गाडी असल्याने गाडीला थांबाचा बसत नाही.अशा रोडमध्ये क्रॉसिंग, असताना गाडी बेभान चालते. रोड वरती वळणे असून गाडीचे स्पीड मात्र एक सारखा राहतो.वाहन ड्रायव्हिंग लायसन्स पुरे करणारे चालक लायसन्स नंतर आरटीओ आणि वाहनाचे नियम विसरून जातात. कमी वेळेत दुसऱ्या ठिकाणी पोहचण्याची अती घाई संकटात घेऊन जात आहे.आपणाला लायसेन्स मिळेपर्यंतच नियम लागू असतात का नाही महाराष्ट्र शासनाने मोटर वाहतूक नियम दाखवल्याप्रमाणे चालक गाडीला फिरवत नाही अशा बऱ्याचश्या चुका चालक मालक करत आहे. पिल्यानंतर गाडीला ड्राईव्ह करणे नियमाने उल्लंघन होय.
अशा सर्व ड्रायव्हिंग करणाऱ्यांनी नियमांचे उल्लघन करणे सुरू केलेले आहे. अहिल्यानगर आरटीओ यांनी माल वाहतूक गाडी चालक, टू व्हीलर चालक, आणि तीन चाकावाल्या गाड्यासहित कारवाया बे धडक कराव्यात.नवीन लायसेन्स पडताळून देण्यात यावे.ड्रायव्हिंग स्कूल शिकाऊ उमेदवारास सुद्धा जास्त कडक नियम लागू करण्यात यावेत. अर्धवट चालक वाहन रोडवरती चालवताना अंदाच्या आणि स्पीडने आलेल्या लहरीने वेग वाढवत जातो आणि गाडीचा अपघात घडत आहे.
अर्धवट शिकाऊ चालक रोड हायवेला असल्याने अपघात होतात. आपण कोणतीही चाचणी नियमात न घेतल्याने लायसन्स धारक वाढत आहे. ड्रायव्हिंग स्कूल खोलून एजेंट गाडीतील स्टेरिंग आणि गियर क्लच विषयक सांगतात.बरेचशे अर्धवट शिकाऊ लायसेन्स घेऊन नागरिकांचा जीव घेत आहेत.नवीन वाहन घेणारे गाडी चालवताना सावकाश आणि रोड साईडने चालवावी.
सावध:नवीन चालकास गाडीचा वेग इतकाच ठेवावा की आपली गाडी पाहिजे त्या जागी उभा रहावी. जास्त वाहतूक असलेल्या ठिकाणावरती सावकाश ठेवत जावे. वळणावरती गाडीचे स्पीड एक सारखे नसावे. वळणावरती गाडी कमी आणि नजरेत रोड ठेऊन वळण घ्यावे. आपण दिलेल्या नियम आणि इशारा फलकावरती पाहून गाडी पुढे न्यावी.
आपल्यासाठी महत्वाचे
आपले प्राण आपण वाचवा दुसऱ्याचे तो वाचवेल.
आपण वेळेत जाण्यासाठी वेळेत निघावे.
प्राण्यांना नियम नसतात वाहन चालक यांना नियमाचे भान हवे.
वाहनाची स्टेरिंग इतकीच फिरवा गाडी रोड वरती येईल इतकीच.
गाडीचा प्रकाश दिवा रोड वरती ठेवाव समोरील वाहनाच्या चालकावरती नव्हे.
आपण शिकलेले नियम पाळत जावा गाडी अपघात टाळा.
