रस्ता खोदल्याने वाहने दिसेनात अपघात टळेना
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार २७ डिसेंबर २०२५
श्रीगोंदा:शनि चौक ते बागडे कॉर्नर रस्ता खोदलेला आहे . या कामात सुमारे ६ फूट खोली काम खोदले गेले आहे.या कामातून वाहतूक चालू राहते.यातून गाडी हि दुसऱ्या बाजूला मार्गस्थ केली जाते.रस्ता वाहतूक हि वाहनाच्या विरुध्द दिशेने चालू असल्याने गाडी अचानक वाहत्या रस्त्यावर प्रवेश करते रस्त्यावर दुभाजक बसविलेले असतात व रस्ता खोली हि जास्त असल्याने वाहन अचानक आडवी प्रवेश करतात.
अचानक गाडी दिसते मोटारसायकल टक्कर होतात. रस्ता खोदल्याने खोदल्याने वाहने हि दिसत नाहीत. अपघात हा प्रकार कायम घडत आहे. श्रीगोंदा नगरपरिषद यांनी हे काम जलद गतीने पूर्ण करावे स्थानिक नागरिकांकडून या अपघात विषयावर चर्चा करण्यात आली.
रस्ता काम लवकरात लवकर पूर्ण करावे व नागरिकांचे अपघात टाळावे अश्या धोकादायक रस्त्यावर २५ डिसेंबर रोजी दुपारी एक एक्सिडंट घडला आहे. अशेच यापुढे अपघात होऊ नये अशी उपाय योजना आखली तर योग्य ठरेल कामात तत्परता ठेवण्यात याव्यात.
श्रीगोंदा नगरपरिषदने रस्ता पूर्ण हा लवकरात लवकर कसा होईल याच्यावर भर देण्यात यावा विकास कामे सुरू करण्याअगोदर अशा लांबणीवर आणि धोकादायक कामावर कामगार ठेवावे.अथवा फलक लावण्यात यावेत नागरिकांचा या रोडवरती जास्त प्रमाणात वावर होत आहे. तहसील,श्रीगोंदा पोलिस स्टेशन,पंचायत समिती, तलाठी कार्यालय हे सर्व सरकारी कार्यालय या परिसरात सुरू असतात.
श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक सरकारी कामकाजास ये जा करत असतात त्यात या ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांना सारखे ऑफिस कामकाज करण्यास सरकारी कार्यालयात जावे लागते. रस्ता काम सुरू असताना साइड पूर्ण बंद करण्यात यावी तसेच काम जलद गतीने पुढे सुरू ठेवावे
सूचना:हि सूचना मुख्यतः रस्ता कॉन्ट्रॅक्ट व श्रीगोंदा नगर परिषद कामगार अधिकारी वर्गास
🔴🟢🟠🟣
