अग्नीपंखचा महात्मा फुलेंना उपक्रम चिंचकुट वस्ती शाळेचा बदलला लुक
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार १५ नोहेंबर २०२५
अमोल झेंडे :अग्नीपंख फौंडेशनने कांन्तीवीर महात्मा फुलेंना सलाम उपक्रम अंतर्गत लोकसहभागातून हिरडगाव येथील दुर्लक्षित चिंचकुट वस्ती शाळेत भागोलिक बदल केले त्यामुळे चिंचकुट वस्ती शाळेचा लुक बदलला आहे.
या कामाचे लोकार्पण आपुलकी मिशनचे जिल्हा समन्वय रमेश कासार उद्योजक संजयकुमार मचे गटविकास अधिकारी राणी फराटे गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी शालेय पोषण आहार योजनेचे तालुका अधिक्षक सत्यजित मच्छिंद्र यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काकासाहेब गुणवरे होते.
रमेश कासार म्हणाले की आपुलकी मिशन अंतर्गत सहा कोटीचे काम झाले आहेत श्रीगोंद्यात अग्नीपंख फौंडेशन जिल्हा परिषद शाळांसाठी चांगले काम हाती घेतले आहे.
संजयकुमार मचे म्हणाले कि मंदीरांना मदत करण्यापेक्षा ज्ञान मंदीरांना मदत करा. ग्रामीण भागातील सरकारी शाळा टिकणे काळाची गरज आहे
गटविकास अधिकारी राणी फराटे म्हणाल्या की, लोकसहभागातून शाळा बदलाची चळवळ वाढली आहे अग्नीपंख फौंडेशन त्यासाठी सकारात्मक भावनेने काम करीत आहे.
यावेळी कुसुमकुमारी कानडी नवनाथ दरेकर यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक उषा भोसले यांनी केले.
यावेळी महेश दरेकर अंबादास दरेकर नवनाथ खामकर प्रकाश चव्हाण गोपाळराव डांगे सुनील जाधव गजानन ढवळे बाळासाहेब गिरमकर उत्तरेश्वर मोहोळकर विद्या बनकर अमोल दरेकर उपस्थित होते. सुत्रसंचलन रवी पंडीत यांनी तर आभार गोवर्धन दरेकर यांनी मानले.
केलेल्या सुधारणा : शाळा रंगकाम प्रवेशद्वार गेट खेळाडू फलक राष्ट्रीय प्रतिके फरशी फर्निचर पेव्हींग ब्लाक राष्ट्रपुरुष संदेश ध्वजस्तंभ आदि सुधारणा केल्या आहेत.🔴🟠🟢🟣
