संविधान जागृती व धम्मप्रचारक रावसाहेब घोडके यांना गुणगौरव पुरस्कार देण्यात आला.
श्रीगोंदा प्रतिनिधी:बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप, भारतीय संविधान विश्लेषण समिती व द्वारका महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलनात विशेष सन्मान करण्यात आले. यावेळी बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, भारतीय संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य आणि द्वारका महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था, त्रिवेणी नगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ष चौथे वार्षिक स्नेहसंमेलन व विशेष गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. मागील चार वर्षांपासून संविधान जागृती, भारत देशाची प्रगती आणि धम्मप्रचारासाठी सदैव तत्पर असणाऱ्या प्रमुख उपस्थित मान्यवरांचा गौरव या व्यासपीठावर केला जातो.
या परंपरेला पुढे सुरू ठेवत, याही वर्षी देशहिताच्या समाजहिताच्या कार्यात निस्वार्थपणे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक होते प्रा. डॉ. दि.वा. बागुल (मुख्य संयोजक, धम्म अभियान) तर मुख्य अतिथी म्हणून अँड. धनीराम वंजारी (राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक, भारतीय संविधान प्रचारणी सभा भारत) उपस्थित होते.
समारंभाचे अध्यक्षस्थान शारदा रामचंद्र लोंढे यांनी भूषविले. यावेळी मुकेश गायकवाड सर, नामदेव खाडवे, सुभाष सोनवणे साहेब, प्रियंका वंजारी, वसुंधरा भोसेकर, गायकवाड मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात संविधानाच्या मूल्यांवर, सामाजिक समतेवर आणि धम्मप्रचाराच्या गरजेवर मान्यवरांनी मोलाचे विचार मांडले. समाजातील कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरेल असा हा स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभ यशस्वी संपन्न झाला.
