नागवडे कारखान्याचा सन २०२५- २६ च्या ५१ व्या गाळप हंगामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न.
जिल्हा प्रतिनिधी :उच्चांकी ऊस दरासाठी ऊस उत्पादकांनी नागवडे कारखान्यालाच ऊस द्यावा – अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे उच्चांकी ऊस भावासाठी ऊस उत्पादक व सभासदांनी ऊस दराची चिंता न करता चालू गाळप हंगामात नागवडे कारखान्यालाच ऊस द्यावा, असे आवाहन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी केले आहे.सहकार महर्षी नागवडे कारखान्याचासन २०२५- २६ या ५१ व्या गाळप हंगामाचा शुभारंभ व गव्हाण पूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी जेष्ठ सभासदांच्या हस्ते काटा, पूजन करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली भूषण महाराज महापुरुष व सादलगावचे प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.
यावेळी मार्गदर्शनपर भाषणात अध्यक्ष राजेंद्र नागवडे पुढे म्हणाले की, गेल्या साठ वर्षापूर्वी या नगर दक्षिण जिल्ह्यात सहकार महर्षी बापूंनी या सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. कारखानदारी चालवताना देखील एक आगळावेगळा विश्वास सभासदांनी सहकार महर्षी बापूंच्या नेतृत्वावर ठेवून आज श्रीगोंदा तालुक्याची या सहकार चळवळीच्या माध्यमातून मोठी प्रगती पाहायला मिळते. सहकार महर्षी बापूंनी खाजगी कारखाना ढोकराईच्या माळरानावर प्रथम साडेबाराशे मेट्रिक टनाने सुरू करून तो आज 7000 मेट्रिक टनापर्यंत चालवला जात आहे.असे सांगून नागवडे पुढे म्हणाले की, सहकार चळवळ टिकवली तरच ऊस उत्पादक व सभासदांची प्रगती होणार आहे. असे सांगून नागवडे पुढे म्हणाले की, सहकारामध्ये आपले विचार प्रत्येकाला मांडता येतात. परंतु खाजगी मध्ये विचार ग्राह्य धरला जात नाही.नागवडे कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीत वेळोवेळी ऊस उत्पादक, सभासदांना सर्वतोपरी मदत केलेली आहे. यापुढेही करणार आहे. खाजगी कारखाने उस भावाचे अमिष दाखवून आपल्या कार्यक्षेत्रातील चांगल्या प्रतीचा ऊस गाळपासाठी नेतात. त्या क्षेत्रातील ला ऊस उत्पादकांनी बळी पडू नये, गाळप हंगामात 14 ते 15 लाख टन ऊस गाळप झाले तर नागवडे कारखाना निश्चितपणे उच्चांक भाव देईल, परंतु कारखान्याचे जर दोन ते अडीच महिने गाळप अन कामगारांना बारा महिने पगार या बाबी कारखाना प्रशासनाला आर्थिक दृष्ट्या कठीण बनते आहे. सभासद व ऊस उत्पादकांनी ऊस भावाची चिंता करू नये, याउलट अधिकाधिक ए- आय च्या टेक्निक धर्तीवर ऊस लागवड करून उच्चांकी उसाचे उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ऊस तोडणीचे देखील कारखान्याने योग्य नियोजन केलेले आहे. त्यामुळे गाळप हंगामात ऊस उत्पादकांनी घाही न करता व कुठल्याही आमिषाला बळी न पडता नागवडे कारखान्याला ऊस द्यावा, असे आवाहन श्री नागवडे यांनी यावेळी केले आहे.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यावेळी म्हणाले की, कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होताना सर्वांच्या आनंदात भर पडणार आहे. चालू वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे.
अशा परिस्थितीतून आज शेतकरी वाटचाल करत आहे असे सांगून श्री भोस पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने ऊस शेती करून.अधिकाधिक उत्पन्न मिळवावे. सहकार महर्षी बापूंनी मोठ्या संघर्षातूनही सहकार चळवळ उभारली आहे. बापूंच्या विचारसरणीवरच अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे व संचालक मंडळ कारखान्याचा काटकसरीने कारभार करत आहे असे सांगून या सहकार चळवळीचे आपण सर्वांनीच रक्षण करून आपलीच कामधेन समजून नागवडे कारखान्यालाच ऊस द्यावा, असे श्री भोस यांनी सांगितले.यावेळी भूषण महाराज महापुरुष यांनी चालू गाळप हंगामासाठी धार्मिक पद्धतीने शुभेच्छा देत कारखाना व उत्पादकांची भरभराट व्हावी व निर्विघ्नपणे गाळप हंगाम यशस्वी व्हावा अशी प्रार्थना व्यक्त केली.याप्रसंगी नागवडे कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव शिंदे यांनी प्रास्ताविकात कारखान्याच्या मागील व पुढील चालू वर्षाच्या गाळप हंगामाचा लेखाजोखा मांडत, चालू गाळप हंगामात ऊस उत्पादकांनी कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता तसेच ऊस भावाची चिंता न करता नागवडे कारखान्यालाच ऊस द्यावा, असे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे, राम अण्णा नागवडे, युवा नेते दिग्विजय सिंह नागवडे, पोपटराव खेतमाळीस, डॉ. अशोक शेलार, कांतीलाल होळकर, कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, ऊस उत्पादक, सभासद, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे, तसेच सर्व खाते प्रमुख तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर यांनी मानले.
