प्रभागात केलेल्या विकास कामाच्या जोरावर निवडुन येणार -मनोहर पोटे.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार १७ डिसेंबर २०२५
तालुका प्रतिनिधी:
श्रीगोंदा– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्या मार्फत राज्यात वेगाने कामे होत असल्याने तसेच आपण नगराध्यक्ष आणि नगरसेवक म्हणून शहर आणि जुना प्रभाग क्रमांक ४आताचा प्रभाग क्रमांक ७ मध्ये रस्ते आणि गटारीची समस्या सोडवल्याने नागरिकांनी शिवसेनेच्या स्वतंत्र पॅनलचे स्वागत केले शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.शुभांगी पोटे व नगरसेवक पदाची निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार विजयी होतील आणि शनिवार दिनांक २० डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक ७ब मधील होणाऱ्या एका जागेच्या निवडणुकीत आपण मोठ्या फरकाने विजयी होऊ असा विश्वास माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक ७ब मधील मतदारांच्या भेटीत नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून नागरिक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामावर समाधानी असून भविष्यात देखील विकास कामे वेगाने होतील अशी खात्री नागरिकांना आहे असे सांगून पोटे म्हणाले आम्ही विकास कामाच्या माध्यमातून मत मागत आहोत.नागरिकांनी देखील पूर्वीच्या काळात असलेल्या समस्या आणि आमच्या साडेसात वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात झालेली कामे पाहिली आहेत नगर परिषद हि नागरिकांच्या नागरी सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्याने काम करते आम्ही देखील सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानूनच काम केले त्यामुळेच अशक्य वाटणारे स्वतंत्र पॅनल अखेर उभे राहिले उमेदवार नागरिकांच्या विश्वासास पात्र असणारी मिळाले असे सांगून प्रभाग क्रमांक ७ब मधील आपला विजय निश्चित होईल आणि शहर विकासाची घोड दौड सुरू राहील असे स्पष्ट केले.यावेळी मनोहर पोटे यांनी प्रभाग क्रमांक ७ मधील केलेल्या रविवार पेठ रस्ता,हनुमान नगर मधील प्रलंबित रस्त्यांची केलेली कामे,आदींची माहिती दिली.
चौकट
प्रभाग क्रमांक ७ मधील इंदिरा नगर वसाहत हि श्रमिकांची वसाहत असून त्यांना हक्काची जागा मिळावी हि मागणी वर्षानुवर्ष होत राहिली पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबत धोरण घेत स्वतःची हक्काची जागा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आपण नामदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून येथील रहिवाशांचा हक्काच्या जागेचा आणि त्यावरील घरकुल बाबतचा प्रश्न सोडवू असे मनोहर पोटे यांनी सांगितले.यावेळी नंदकुमार ताडे, बाळासाहेब दुतारे आदी उपस्थित होते.
🔴🟢🟠🟣
