आढळगाव सिद्धेश्वर मंगलकार्यालय करणार कमी खर्चात विवाह सोहळे.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार १६ डिसेंबर २०२५
जिल्हा प्रतिनिधी: आजच्या महागाईच्या काळात श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट (क) देवस्थानच्या माध्यमातून गोर गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील मुला मुलींच्या लग्ना करिता हजारो रुपयाची बचत व लूट न होता, कमी खर्चात दर्जेदार, सुख सुविधा उपलब्ध असून सोहळा पार पडनार आहेत.
या मंगल कार्यालयात आज पर्यंत २०० पेक्षा जास्त विवाह – पार पाडली आहेत. सायंकाळचे अनेक विवाह सोहळे संपन्न झाले आहेत.आढळगाव ग्राममदैवत सिद्धेश्वर हे देवनदी किनारी वसलेले भव्य मंदिर निसर्ग रम्य परिसर, भरपुर प्रमाणात पाणी, भव्य सभा मंडप, स्वच्छता गृह अशा सर्व सुख सोई युक्त असलेले,
कमीत कमी भाडे, लाईट,पार्किंगची सोय असलेले एकमेव मंगल कार्यालय आहे. या कार्यालयात अत्याधुनिक सुख सुविधा व व्यवस्था देण्यात येतील व नव्याने या मंगल कार्यालयाचे नुतुनीकर करण्यात येणार असल्याचे समजते. या कार्यालयाचा वापर जास्तीत जास्त आढळगाव परिसरातील वधू,वर व जेष्ठ नागरिकांनी करावा.पैशाची बचत व्हावी हे एकच ध्येय आढळगावचे,सरपंच,ग्रामस्थ,व सिद्धेश्वर ट्रस्टचे आहे.
याने अनेक समाज एकत्र येऊन मोठे कार्य घडू शकते असा उल्लेख सिद्धेश्वर ट्रस्ट ने केला. जातीचे राजकारण संपविण्याचा हेतू बाळगून आढळगावचे सरपंच उबाळे यांनी अथक प्रयत्न करून या कार्यास गती मिळावी म्हणून सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ एकत्र आणून हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
मंगल कार्यालयास निधी उपलब्ध कसा व किती
या सिद्धेश्वर मंगल कार्यालयासाठी ५० लाख आमदार निधी हा माजी मंत्री बबनराव पाचपुते व आमदार विक्रम सिंह पाचपुते यांनी दिला असल्याने या कार्यास आढळगावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे सह व्हा चेअरमन शरद जमदाडे यांच्यासह ग्रामस्थांनी या कार्यास ३० लाख रक्कम देणगी म्हणून समावेश करण्यात आला आहे.या सिद्धेश्वर मंदिर विकास कामासाठी व मंगलकार्यासाठी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी हा निधी दिला असून नवीन मंगल भव्य इमारत उभी राहणार आहे.गरीबांना परवडणारी व श्रीमंतांना आवडणारे मंगल कार्यालय थोड्याच दिवसात उभे राहणार आहे. असे सरपंच उबाळे यांनी सांगितले.
नियोजन कार्यकारी: पांडुरंग बोळगे, आबा शिंदे, देविदास काळे व ट्रस्टचे अध्यक्ष नानाभाऊ बोळगे यांचे मंदिराकडे व कार्यपद्धतीकडे लक्ष असेल .
🔴🟢🟠🟣
