डॉक्टर आंबेडकर नॅशनल अवॉर्ड,दिल्ली २०२५ आधुनिक लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांना जाहीर
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार २२ नोव्हेंबर २०२५
अहिल्यानगर:भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली आयोजित डॉक्टर आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवॉर्ड २०२५ चा आधुनिक लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांना जाहीर झाला. त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वसामान्य पीडित गोरगरीब समाजाच्या न्याय हक्कासाठी अनेक प्रकारचे आंदोलने उपोषण रस्ता रोको मोर्चे लोकप्रतिनिधींच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले असून तसेच रस्ता वीज पाणी आदी प्रश्नावर वेगवेगळ्या स्टाईल ची आंदोलन .
तहसील कार्यालय पंचायत समिती पोलीस स्टेशन कलेक्टर कार्यालय आदी ठिकाणी सर्वसामान्यांच्या न्याय हक्काची लढाई लढत असताना अनेक सामाजिक संस्थांनी संघर्ष रत्न आंदोलन फेम, माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राज्यस्तरीय पुरस्कार, समाजसेवक पुरस्कार, समाज रत्न, पुरस्कार स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय सावित्री ज्योती पुरस्कार, धर्मवीर संभाजी महाराज व अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त स्वराज्य भूषण पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत गाडगे महाराज जयंती निमित्त महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
आधुनिक लहुजी सेनेचे सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्या कार्याची दखल घेऊन भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांनी २०२५ चा डॉक्टर आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवॉर्ड जाहीर केला असून त्यांचे राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.व होणार असल्याने त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला आहे याने कार्यकर्ते, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे हि संतोष शिंदे म्हणाले.
विशेष
आंदोलन
उपोषण
न्यायाची लढाई
सामाजिक क्षेत्रातील कामे
🔴🟢🟣🟠
