डॉ. स्वप्नील राजेंद्र सिदनकर यांचे घवघवीत यश – एमबीबीएस पदवी प्रथम श्रेणीत संपादन
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार १२ एप्रिल २०२६
पुणे : काशीबाई नवले मेडिकल कॉलेज येथे शिक्षण घेतलेल्या डॉ. स्वप्नील राजेंद्र सिदनकर यांनी एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल कॉलेजमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला असून पुढील वैद्यकीय सेवेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉ. सिदनकर यांनी अत्यंत परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत केवळ स्वतःचेच नव्हे तर आपल्या कुटुंबाचे नावही उज्ज्वल केले आहे. रुग्णसेवा हीच खरी सेवा मानत त्यांनी भविष्यात समाजासाठी कार्य करण्याची भावना व्यक्त केली.
वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अभ्यासू वृत्ती, समर्पण आणि कठोर मेहनत आवश्यक असते, याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे. आजच्या काळात अशा जिद्दी व समर्पित विद्यार्थ्यांची गरज अधिक असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
डॉ. सिदनकर यांचा वैद्यकीय व्यवसाय हा त्यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचा वारसा आहे. त्यांच्या वडिलांप्रमाणेच तेही डॉक्टर असून रुग्णसेवा करत आहेत, तसेच त्यांचे आजोबा सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते. त्यामुळे वैद्यकीय सेवा ही त्यांच्यासाठी केवळ व्यवसाय नसून एक परंपरा आहे.
मुळचे श्रीगोंदा येथील रहिवासी असलेल्या डॉ. स्वप्नील सिदनकर यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करत प्रथम श्रेणीत यश मिळविले असून त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
🟣🔴🟢🟠
