आज श्रीगोंद्यात श्री संत शेख महंमद महाराज यांचा भव्य यात्रा उत्सव.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६
मुख्य संपादक :शेख महंमद महाराज यांची ३२८ वी संजीवन समाधी यात्रा २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आमला एकादशी दिवशी यात्रा उत्सव साजरा होत आहे.शेख महंमद महाराज यांच्या यात्रेसाठी कडक सुरक्षा श्रीगोंदा नगरपरिषदेकडून ठेवण्यात आली आहे. या यात्रेत श्रीगोंदा पोलिस निरीक्षक यांच्याकडून देखील पोलिस कर्मचारी जागोजागी सुरक्षेसाठी सज्ज असणार आहेत. श्रीगोंदा शेख महमंद महाराज यात्रा कमिटी देखील व्यवस्थापन करते. या यात्रेचे खरे सत्य म्हणजे विठ्ठल भक्त महमंद महाराज आहेत. यात्रा श्रीगोंदा शहरासह संपर्ण तालुक्यातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात.पुढे महमंद महाराजांबोबर तुकाराम महाराज यांच्या गाठी भेटी वास्तव्याचीच आहे.
खर म्हणजे तुकोबा म्हणे जो पांडुरंग माने मी त्याला सांगे संत महंमद भेटी मी आलो शिरोमणी संत महंमद विठ्ठला जपे भजे जो माझ्यावर गुण गायीला तो माझ्या चरणी आहे. सर्व काही माझ्यातच आहे. जो माझ्यातच मिळतो तो मीच असतो. म्हणून महंमद नाम घेई तो मजला च मिळे तो मीच आहे जो सर्वांन मध्ये स्थित आहे. म्हणून संत महंमद महाराज यात्रा हि पांडुरंगाची यात्रा आहे. संत महंमद भक्ती गीत भजता भजता पांडुरंगाशी जाऊन मिळाले. ते पांडुरंग च होऊन गेले आहेत. मुख्यतः संत तुकाराम महाराजांच्या मंडपाची आग विजविणारा कोण असेल तो पांडुरंगच असणारा माऊली
कारण तुकाराम हे विठ्ठलाची भक्तीत लीन झालेले होते. त्यांचा मंडप दुसरा कोणी विजविला नाही आहे. कारण मुखी नाम विठ्ठलाचे होते. संत शेख महंमद महाराज तुळशीची माळ घालून भक्तीत दंग राहत होते. त्यांना विठ्ठलाची भक्तीने विठ्ठलाचे स्वरूप मिळाले आहे. विठ्ठल मंदिरात तर होतेच पण प्रत्येकी आत्मरुपी हि होते त्यांनी संत शेख महंमद महाराज यांच्या देहात प्रवेशले होते. जो जो कोणत्याही लोभापाई भक्ती करत असतो तो ईश्सरास प्राप्त करत नाही. अशा विठ्ठल भक्तानी तुकाराम महाराज यांचे आगीचे संकट हरले आहे.आज त्या थोर संत महाराज यात्रेची सुरवात झाली आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व पांडुरंग भक्तांनी संत तुकाराम महाराज प्रमाणे एक वेळेस भेटीस नक्की यावे
यात्रेचे नियोजन कसे असणार आहे.
सुरक्षा: श्रीगोंदा पोलीस यांच्याकडे आहे. हि सुरक्षा सी सी टी वी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या नजरेत असणार आहे.
नियोजन:कडक बंदोबस्तासह यात्रा कमिटी कडे स्वच्छतेची व आणि भक्तांची सुख सुविधा पुरवणारे श्रीगोंदा नगर परिषद यांची असणार आहे.
यात्रेतील सतर्कता आणि दर्शन:यात्रेत येणाऱ्या भावी भक्ताना वाहन पार्किंग साठी सोयीस्कर सोय उपलब्ध केली आहे. यात्रेत प्रवेश करण्यासाठी दागिने, मोबाईल जवळ बाळगू नये. दर्शना व्यतिरिक्त महिलांनी जास्त वेळ घालवू नये. यात्रेतील गर्दीचे कारण बनू नये. यात्रेतील खरेदी झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी योग्य दिशेने प्रवाह ठेवावा. वारंवार यात्रेत सहभागी होऊ नये. दर्शन रांगेत उभे राहून घ्यावे. कुठलीही हुल्लडबाजी आतिषबाजी करू नये आपण सर्व सी सी टीवी मध्ये कैद राहणार आहोत. पिण्याच्या पाण्याची बॉटल खाली फेकू नये. स्वच्छतेची काळजी घ्यावी.
मंदिर परिसरात: कागद प्लास्टिक फेकू नये. मोबाईल कॉल घेऊ नये. मोबाईल संपर्क मंदिरातील माहिती बाहेर टाकू नये. फोटो शूट करण्यास मनाई आहे. आवाजाची पातळी लो ठेवावी. प्रसाद है संत महंमद महाराज यांच्या डिश मधेच ठेवावा. धूप बत्ती लांब लावावी. चादर घालण्याचे काम सेवेकरी करतील.. सेवेकरी यांच्या परवानगी शिवाय महाराज यांना स्पर्श करू नये स्पर्श करण्याची ठिकाण त्यांच्या पायाशी आहे. वेळेचे भान ठेऊन दर्शन घ्यावे. मंदिरात आपसात चर्चा नको.
