‘मी तुझ्यापेक्षा सिनिअर,घराबाहेर उभं करायची’,बायकोच्या छळाला कंटाळून पोलिसाचं टोकाचं पाऊल, डोंबिवली हादरली
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
४ जून २०२६
Dombivali Crime News : डोंबिवलीतील पोलीस कर्मचारी श्रीराम मिसाळ यांनी मागच्या एप्रिल महिन्यात आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या आत्महत्येच्या घटनेने पोलीस दलात खळबळ माजली होती.
या घटनेला आता नवं वळण मिळाले आहे. कारण या प्रकरणात आता श्रीराम मिसाळ यांच्या पत्नीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे श्रीराम मिसाळ यांच्या पत्नी देखील पोलीस सेवेत आहेत. त्यामुळे पोलीस पती-पत्नीमध्ये असं काय घडलं? ज्यामुळे मिसाळ यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं? हे जाणून घेऊयात.
डोंबिवलीच्या विष्णुनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या श्रीराम मिसाळ यांनी 28 एप्रिल 2026 रोजी आत्महत्या केली होती.या आत्महत्येच्या घटनेनंतर श्रीराम मिसाळ यांचे भाऊ लक्ष्मण मिसाळ यांनी भावाच्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते. श्रीराम मिसाळ आणि शिवगंगा यांचं लग्न 2010 साली झालं होतं. लग्नानंतर काही दिवसातच शिवगंगाने हे लग्न मान्य नसल्याचे सांगितले होते.मी तुझ्यापेक्षा 2 वर्षे वरिष्ठ आहे आणि माझा पगारही तुझ्यापेक्षा जास्त आहे, असे टोमणे मारून शिवगंगा श्रीरामचा छळ करायची,असे भाऊ लक्ष्मण मिसाळ यांनी तक्रारीत म्हटलं आहे. तसेच अनेकदा शिवगंगा श्रीराम यांना स्वत:च्या घरातून बाहेर ठेवायची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर त्यांचा अपमान करायची, असे लक्ष्मण मिसाळ यांनी तक्रारीत सांगितले आहेत.
तसेच या आत्महत्या प्रकरणात श्रीराम यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्याचे नावही समोर आले आहे. शिवगंगा आणि श्रीराम यांचा सहाकारी पोलीस यांच्यातील संबंधांमुळे श्रीराम यांना प्रचंड मानसिक त्रास दिला जात होता, असा दावा लक्ष्मण मिसाळ यांनी केला होता. या संबंधित काही महत्वाचे ऑडिओ रेकॉर्डींग्जदेखील पुरावा म्हणून पोलिसांकडे देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सूरू केल आहे.
या प्रकरणात पोलिसांनी श्रीराम यांची पत्नी शिवगंगा उर्फ मिथिला मिसाळ हिच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.तसेच या प्रकरणात एका महिलेचे नावही समोर आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांनी सहकारी पोलीस आणि महिलेचा कसून तपास सूरू केला आहे.त्यामुळे या संपूर्ण घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे.या घटनेने डोंबिवलीमध्ये खळबळ माजली आहे.
🟣🔴🟢🟠
