महाराजा कॉलेज सार्थ अभिमान पैलवान संदीप गायकवाड याची शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
श्रीगोंदा प्रतिनिधी:महाराजा कॉलेज कुस्ती खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी दिनांक 14 ते 16 ऑक्टोबर 2025 रोजी त्रिमूर्ती संकुल नेवासा फाटा येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय 19 वर्षे मुले व मुली कुस्ती स्पर्धेमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील तीन खेळाडू संदीप गायकवाड, श्रुतिका पवार व समीक्षा टोणगे यांनी आपापल्या वजन गटांमध्ये अतिशय उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मेडल प्राप्त झाले त्यामध्ये पैलवान संदीप गायकवाड याने 77 kg ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत अतिशय छान कुस्त्या करत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला त्याची एक नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर 2025 रोजी हरियाणा पानिपत येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
तसेच पैलवान श्रुतिका पवार हिने 76 kg वजन गटामध्ये सिल्वर मेडल तर पैलवान समीक्षा टोणगे येणे 62 kg वजन गटामध्ये ब्रांझ मेडल मिळवले.
तीनही खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली व महाराजा कॉलेज व श्रीगोंदा तालुक्याचे नाव सर्व राज्यस्तरावर गाजवले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माजी आ. बबनराव पाचपुते, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मा. बाबासाहेब भोस, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी आ. राहुल जगताप, मा. महावीर पाठवा, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, डॉ.सुदाम भुजबळ, डॉ.नितीन थोरात, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे, जिमखाना प्रमुख प्रा.रमेश थोरात व प्रा. श्रीकांत थोरात, विभाग प्रमुख प्रा रमेश भुजबळ, प्रा. उषा बोरुडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, श्रीगोंदा तालुका क्रीडा समिती अध्यक्ष सचिन जामदार, सर्व क्रीडा समिती, विद्यार्थी, पैलवान प्रेमी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंना क्रीडा शिक्षक संजय डफळ, क्रीडा संचालिका कल्पना बागुल पालक पै. अण्णा गायकवाड, भरत पवार व गोरख टोणगे यांचे मार्गदर्शन लाभले.
