तांदळी दुमाला येथे विद्यार्थ्यांच्या मैदानातील अडथळा दूर
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार २० मे २०२६
श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला येथील तांदळेश्वर माध्यमिक विद्यालय प्रयोग शाळेला लागून असलेला वीज पोल विद्यार्थ्यांच्या खेळाच्या मैदानासाठी अडथळा ठरत होता. विद्यार्थ्यांना खेळताना अडचणी निर्माण होत असल्याने ग्रामस्थांकडून पोलची जागा बदलण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीसाठी तांदळी दुमाला गावचे माजी उपसरपंच राजेंद्र भोस तसेच सदस्य भारत शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा व मैदानाच्या उपयोगाचा प्रश्न मांडला.
अखेर श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या स्तरावर पाठपुरावा करण्यात आल्यानंतर संबंधित पोलची जागा बदलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता खेळाच्या मैदानाचा योग्य वापर करता येणार असून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत
🟠🟣🔴🟢
