तांदळी दुमाला स्मशानभूमी कामातील भ्रष्टाचारावर ग्रामस्थांचा संताप
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार २० मे २०२६
२ .भ्रष्टचार करणाऱ्या व्यक्तीला कपडे काढून उघडा फिरविण्यात येईल.
अहिल्यानगर जिल्ह्यातील तांदळी दुमाला गावातील स्मशानभूमी विकास कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. संबंधित कामामध्ये अनियमितता, निकृष्ट दर्जाचे साहित्य तसेच निधीचा गैरवापर झाल्याचे बोलले जात असतानाही पंचायत समितीकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांच्या मते, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. “या भ्रष्टाचारामागे एखाद्या राजकीय नेत्याचे पाठबळ आहे का?” असा सवाल आता नागरिक उघडपणे उपस्थित करत आहेत.
पंचायत समितीच्या मुख्य अधिकारी रानी फराटे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “छुप्या पद्धतीने कामे चालवणे कितपत योग्य आहे?” असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या प्रत्येक कामाचे पारदर्शक नियोजन होणे आवश्यक असताना संबंधित कामांमध्ये दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
स्मशानभूमी हे गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून अशा ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचे आरोप गंभीर मानले जात आहेत. ग्रामस्थांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पंचायत समिती श्रीगोंदा प्रशासनाने याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
🟠🟣🔴🟢
