तांदळी गावात स्मशानभूमीत भ्रष्टचार गावातून आरडा ओरड सुरू
निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार २७ मार्च २०२६
तांदळीतांदळी दुमाला येथे काही ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच यांनी ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमी सुशोभीकरण येथील कामाची तक्रार करून चौकशी लावली होती. चौकशी दरम्यान निपक्ष चौकशी होणे अपेक्षित होते.परंतु पांढरे साहेब आणि भोसले साहेब हे दोन्ही अधिकारी संशयाच्या भौऱ्यात सापडले आहेत. त्यांनी ग्रामस्थांना दगडफेक केल्याचे कृत्य व्हिडिओतून समोर येत आहे तसेच त्यांनी ग्रामस्थांना दमबाजी व शिवीगाळ केली आहे .
याची व्हिडिओ फुटेज उपलब्ध झाले आहेत. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून श्रीगोंदा विधानसभेचे लोकप्रिय आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडे गेले आहे. त्यांनी सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वरिष्ठांकडे अधिकाऱ्यांच्या वागणुकीचे शिंतोडे ओढले आहेत. हे दोन्ही अधिकारी अतिशय भ्रष्ट असून पूर्णपणे ठेकेदारांचे अधिकारी आहेत. चौकशी दरम्यान पूर्णपणे कामांमध्ये चिखल काळी माती असल्याने हे अतिशय निकृष्ट पद्धतीने काम केलेले दिसत आहे.
अधिकाऱ्यांची ही चौकशीची पद्धत अतिशय चुकीची आहे याची गंभीर दखल लोकप्रिय आमदार विक्रम पाचपुते यांनी घेतली आहे. भ्रष्ट अधिकारी पांढरे साहेब आणि भोसले साहेब यांचे तात्काळ निलंबन व्हावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. हे प्रकरण वरिष्ठ लेवलवर जाणार असून लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या दारात ग्रामस्थांमार्फत आंदोलन होणार आहे.
ठेकेदारांनी अतिशय निकृष्ट काम केलेले असून त्या कामाची दखल घ्यायची सोडून ग्रामस्थांना दमबाजी शिवी गाळ या अधिकाऱ्यांनी केलेले आहे. सदर गोष्टीची माहिती गटविकास अधिकारी श्रीगोंदा यांना कळवण्यात आलेले आहे.
आमदार साहेब काय चाललय
सरपंच आणि ठेकेदार यांचा फार मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे. गेली दहा वर्ष एकाच ठेकेदाराला ग्रामसेवक आणि सरपंच यांनी काम दिलेले आहे हे समोर आलेले आहे. गावातील लोकांना गावातील कामे द्या अशी ग्रामस्थांची मागणी आहे त्या संदर्भात ठराव झालेले असून कामे हिरडगाव येथील ठेकेदारांना दिली जातात या गोष्टी आर्थिक लाभासाठी आहेत का असा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे