मांडोगण कात्राबाज नवीन रोड काम धोकादायक
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार २८ मार्च २०२६
अपघात:मांडोगण कात्राबाज येथे मांडोगण श्रीगोंदा अपुरा रोड वरती मांडोगण वॉटर सप्लाय करणाऱ्या टाकीच्या लगत जोरदार धडक झाली. हि धडक अतिशय जोराची होती. या गाडीच्या धडकेत गाडी स्वार जखमी झाला असून अत्यंत जखमी झालेला दिसला त्यातील अपघात व्यक्ती गणेश शिंदे पिंपर खेड गावातील असून या युवकाला डोक्याला जोराचा मार बसला व वेदना सहन करताना समोर दिसून आला.
तर मागील सवंगडी डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत असताना जागीच गप्प बसला आहे. दुसरा गाडी चालक रस्त्यावर डोक्यातील हेल्मेट असूनही घायाळ झाला आहे.हा खांडगाव मधील युवक आहे.
याचे नाव समोर आलेले नाही. मात्र आडनाव हे वाळके आहे.या अपघाताचे मुख्य कारण रस्त्याच्या कामातील साइड पट्टी भरलेली आढळून आलेली नाही. तसेच वळणावरती सूचना दर्शवणारी पाटी अद्याप बसवले गेली नसून वळणावरती जास्त प्रमाणात उतार आढळत आहे.
अशा अनेक रस्ता अधुरा कामे असल्याने किंवा चालू काम चालू ठेवल्याने अनेक प्रकारचे अपघात घडत आहे. हे सर्व मांडोगण आणि समस्त ग्रामस्थांकडून ओरड येत आहे.गावालगतचे रस्ते दुरुस्त कामे पूर्ण करावीत शाळेतील मुले मुली शाळेसाठी येत असतात.
सूचना: रोड कॉन्ट्रॅक्टर यांना आहे. काम हे अतिशय कमी गतीचे आहे. याला गती देण्यात यावी.
🟣🔴🟢🟠
