तांदळी–वाघजाई रस्ता काम प्रगतीपथावर; ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार २ एप्रिल २०२६
श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला येथे तांदळी ते वाघजाई या महत्त्वाच्या रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरू असून हे काम अत्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार पद्धतीने करण्यात येत आहे. माजी आमदार तथा माजी मंत्री बबनदादा पाचपुते साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून या कामाला चालना मिळाली आहे.
या रस्त्यामुळे भोस, गंगाधरे, बोरुडे, हराळ, घालवडे, शिंदे, काळे वाघ आदी वस्त्यांवरील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः दळणवळण सुलभ झाले असून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सुरक्षित व सोयीस्कर मार्ग उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
कामाची पाहणी करताना मा. उपसरपंच राजेंद्र भोस, प्रगतशील शेतकरी साहेबराव भोस, दादासाहेब भोस तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्वांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते साहेब, लोकप्रिय युवा आमदार विक्रम पाचपुते साहेब, युवा नेते प्रताप भैय्या पाचपुते व परिक्रमा संकल्पनेच्या अध्यक्षा प्रतिभा पाचपुते अक्का यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या कामासाठी बापूसाहेब शेळके, राजेंद्र भोस, हौसराव बोरुडे आणि सर्व ग्रामस्थांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे काम मार्गी लागल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
🟣🔴🟢🟠
