नवले महाराजांचा मांदळी येथे सन्मान सोहळा संपन्न
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार ३१ मार्च २०२६
मांदळी (प्रतिनिधी) – कामदा एकादशी निमित्त श्री क्षेत्र मांदळी येथे ओम चैतन्य आत्माराम गिरी यांच्या पवित्र दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत कीर्तनकार ह.भ.प. आबासाहेब महाराज नवले यांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन मांदळी ट्रस्टचे अध्यक्ष धनराजजी गांगर्डे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी नवले महाराजांनी आपल्या मनोगतात संतांच्या कृपेचा उल्लेख करताना सांगितले की, “संतांचे उपकार शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत. ज्ञानोबा-तुकोबांच्या आशीर्वादामुळे आणि ओम चैतन्य आत्माराम यांच्या कृपेने मला दरवर्षी कीर्तन सेवेची संधी मिळते. हीच माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे.”
या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्रातील अनेक मान्यवर किर्तनकार उपस्थित होते. यामध्ये ह.भ.प. शिवाजी महाराज चितळकर, ह.भ.प. विजुभाऊ घालवडे, ह.भ.प. गायनाचार्य काळे महाराज, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज ढवळे, ह.भ.प. सोमनाथ महाराज गांगर्डे, ह.भ.प. दत्तात्रय महाराज खोटे, ह.भ.प. गायनाचार्य दिलीप महाराज मुळे, ह.भ.प. रवींद्र महाराज गिरमकर यांचा समावेश होता.
तसेच तांदळी येथील उपसरपंच राजेंद्रजी भोस यांचीही कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची शोभा वाढवली.
🟣🔴🟢🟠
