💥अभियानांतर्गत तांदळी दुमाला येथे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचा ग्रामस्थांकडून सत्कार: विकास कामावर आमदारांची झाली चर्चा सुरू 💥
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
सोमवार २ फेब्रुवारी २०२६
प्रतिनिधी:
तांदळी दुमाला (ता. श्रीगोंदा) – तालुक्याचे विद्यमान आमदार श्री. विक्रमदादा बबनराव पाचपुते यांच्या तालुका दौऱ्यानिमित्त तांदळी दुमाला येथे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या वेळी गावातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः अंतर्गत रस्ते, स्मशानभूमीस मंजूर निधी व त्यावरील कामकाजाची माहिती आमदारांनी दिली. तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बी.जी.पी. सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी नोंदणी फॉर्म भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शेती रस्ते, पाणीपुरवठा योजना, महादेव मंदिराशेजारी सभामंडप उभारणी (गरीब नागरिकांचे विवाह व देवस्थान सप्ताहासाठी), तुळजाभवानी मंदिर सभामंडप, गावातील चौका-चौकांत सोलर लाईट बसविणे तसेच तांदळी दुमाला ते वडगाव रस्ता डांबरीकरण मंजुरी मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. या सर्व विषयांवर उपाययोजना करण्याबाबत शेतकऱ्यांशी सखोल चर्चा झाली.
आज २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता तांदळेश्वर मंदिराच्या सभामंडपात ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश गिरमकर, तालुका अध्यक्ष डॉ. विक्रम कसरे, युवा नेते मिलिंद दरेकर, सरपंच अमोल कोहल, महेश दरेकर, नागवडे सर, आमदारांचे पी.ए. योगेश भोसले, उपसरपंच राजेंद्र भोस, लोकनुक्त सरपंच संजय निगडे,ग्रामपंचायत सदस्य, उद्योजक बिपीन शेळके, भरत शेळके, नवनाथ भोस, पोलीस पाटील अनिल शेळके, ग्रामसेवक अण्णा भोस, निलेश शेळके, आध्यात्मिक तालुका अध्यक्ष आबासाहेब नवले, गोपीनाथ धावडे, बापूसाहेब शेळके, हौसरावा बोरुडे, नामदेव धालवडे, झुंबर खुरांगे, संतोष हराळ, व्हा. चेअरमन नाना हराळ, काका कदम, राजू काळेवाघ, डॉ. पी. एम. भोस, बी.जी.पी. सामाजिक कार्यकर्ते तात्या हराळ, कार्यक्रम अध्यक्ष मोहन दगडे, सूर्यभान पोळ, रामदास लांबडे, हरिश्चंद्र शेळके, संचालक मुगुट भोस आदी उपस्थित होते.
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देत शेतकरी व नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपसरपंच राजेंद्र भोस यांनी आमदार व उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले.
🔴🟢🟠🟣
