टू व्हिलर चोरी व सोने चोरी वाढत जाते कशी सामान्य नागरिकांचा प्रश्न
अहिल्यानगर प्रतिनिधी: जिल्ह्यामधील व श्रीगोंदा चोरी होणाऱ्या गाड्या यांचा तपास आजपर्यंत लागलेला नाही. तोच पुन्हा गाड्यांची चोरी वाढलेली आहे. अहिल्यानगर सिद्धटेक श्रीगोंदा व श्रीगोंदा तालुक्यातील गावा गावांमधील नागरिकांना तालुक्याचे ठिकाणी बाजारासाठी यावे लागते.परंतु यावेळेस गाडी लावण्यासाठी पार्किंग जागा नसल्याकारणाने गाड्या रोडवरती लावावे लागतात.व बाजार ठिकाणी गर्दी असल्यामुळे कारणाने अनोळखी व्यक्ती येऊन गाडीला हात लावतात. त्यावेळेस बाजार करणारा व्यक्ती आत मध्ये दूर वरती बाजार करत असतो.त्यावेळेस त्या बाजारात गेल्यानंतर एक ते दीड तास मोडला जातो. या वेळेत गाडीचे हॅण्डल लॉक तोडून गाडी व तिचा स्विच चालू करून गाडी चोरी केली जाते.
चोरी केल्यानंतर गाडीचे इंजिन गाडीची पार्ट या वस्तू वेगवेगळ्या करून विकल्या जातात. किंवा वापरल्या जातात या कारणाने चोरीचा तपास लागणे शक्य होत नसल्याकारणाने श्रीगोंद्यामधील नागरिकांच्या गाड्यांची चोरी होत आहे. त्याला थांबा कधी बसणार व आज गाडीच्या किमती 2 लाख एक लाख 90 हजार ,एक लाख 25 हजार, अशा दरम्यान असतात व कंपनीच्या वरती निर्भर असते.
या चोऱ्या वारंवार होतात. याला जबाबदार स्थानिक पोलिस आहे. याच्या कारणे सर्व पोलीस कर्मचारी यांनी याचे तपास याच्या अगोदर लावलेले आहेत परंतु आज गेले दोन वर्षापासून ज्या गाड्या चोरी झाले आहेत त्यांचा तपास अद्याप लागलेला नाही त्यातच गाडी आरटीओ दंड देताना विचार करत नाही. व नागरिकांना याचा त्रास होतो. व चोरी करणाऱ्यांना पकडू शकत नाही परंतु नागरिकांच्या गाडीचे लायसन्स हेल्मेट आरसा यासारख्या कायद्याच्या कलमानुसार दंड आकारले जातात. हा पैसा शासनात जमा होतो. नागरिकांना कायद्यात ठेवून धमकावून पावत्या व ऑनलाइन पद्धतीने दंड आकारतात मग या अधिकाऱ्यांचा चोरी वरती कायदा का चालत नाही मोठी बाब असल्याकारणाने आरटीओ व स्थानिक पोलिस लोकांना फक्त एकीकडे दंड करायचे तर दुसरीकडे सुरक्षा देण्याचे काम देतात का हे खूप महत्त्वाचे आहे .तारतम्य ठेवून जनतेशी बोलणे खूप गरजेचे आहे . आरटीओ हा गाडीचा नंबर चेक करतो परंतु चोरी केलेली गाडी ही अद्याप धरत नसल्याने आज कित्येक लोकांची चोरी झाली. भरपूर किमतीच्या व मौल्यवान वस्तू म्हणजे सोने चोर पाकीट चोर , यांचा तपास का होत नाही.असा प्रश्न अहिल्यानगर श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांनी पडला आहे.तर गाडी मिळत नसल्याने पोलीसही तपास लागल्यानंतर सांगू असे उत्तर देऊन गाडी शोधण्यास विलंब लागतोच किंवा गाडीचा शोध होत हि नाही हा दिसून आले आहे. पोलिसांची कारवाई व सुरक्षा देण्याचे काम असल्याने सुरक्षेच्या बाबतीत कमी पडत असल्याचे सांगण्यात आले. पोलिस प्रशासन जनतेच्या सुरक्षेसाठी व गुन्हे थांबविण्यासाठी स्थापन झाले आहे. सुरक्षा देण्याचे काम हे कमी व नागरिकांना दंड वसूल करण्यात पुढे आहे.
सूचना; सोन्याचे बाजार वाढल्याने चोरीचे प्रमाण वाढले जाणार आहे आपण आपली सुरक्षा घ्या
