RNI:MAHMAR3133/2025
जास्त फटाके फोडण्याचा प्रयत्न जीव पण घेऊ शकतो
महाराष्ट्र प्रतिनिधी:दिवाळीमध्ये जास्त फटाके फोडण्यचा प्रयत्न जीव पण घेऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांनी दक्षता घेतली पाहिजे.फटाके फोडल्याने जरी मुलांना आनंद मिळाला तरी ते शेवट घातकच आहे. फटाक्यांचा धूर हा प्रदूषण निर्माण करत आहे.फटाके हवेमध्ये धूर व घातक वायू निर्माण करतात हे लक्षात असू द्या.आपण आपल्या परिसराला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करूया हि प्रतिक्रिया मनात धरून कमी प्रदूषण निर्माण करावे.
फटाके गर्दीच्या ठिकाणी फोडू नये.फटाके गाडी पाहून फोडणे. पेट्रोल किंवा ज्वलनशील रसायन पदार्थ किंवा स्फोटक वस्तू पासून कापड, ऊस, पिकांपासून लांब असावे अन्यथा शेत पेटल याची दक्षता ठेवावी.
.वाहतूक रस्त्यावर फटाके फोडू नये. दुसऱ्या कोणा व्यक्तीचा जीव धोक्यात घालून नये. वयक्तिक घरच्या अंगणात वाजवावेत . जास्त कर्कश,व जास्त आवाजाचा केल्याने मानवी व पाळीव प्राणी यांच्या कानातील केंद्र बिंदूला न सहन होणारे आवाज निर्माण करू नये. याचा परिणाम आपल्या मानवी शरीरावर होत आहे.कमी आवाज कमी स्फोटक होणारी फटाके खरेदी करावेत. झाडावरती पेटून फटाके फोडण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा कोणाच्या तरी शरीरावर वीस्तू पडू शकतो.
