श्रीगोंदा प्रतिनिधी:यंदा २०२५ साली कपाशीचे क्षेत्र कमी असूनही यावर्षी दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावरती कपाशीचे भाव खूप कमी निघाले आहेत शेतकरी राजा अडचणीत याचबरोबर कांद्याचे भाव खूप ढासळले आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडे कसलेही दिवाळीला खर्चासाठी पैसे नाहीत व कांद्यालाही भाव नाही याचप्रमाणे नवीन पीक करायचे असेल तर त्यासाठी नवीन भांडवल हि नाही यामुळे शेतकऱ्याची दिवाळी फिकट गोड झाली आहे.
त्याचप्रमाणे यावर्षी लवकर पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती मक्याचे क्षेत्र वाढले आहे. पण मक्याचे भाव जशी मका शेतकऱ्याची बाजारात येत आहे. त्याप्रमाणे कमी होऊ राहिले आहे व कपाशी लवकरात लवकर हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यास न्याय द्यावा भविष्यामध्ये कांद्याने जर ग्राहकाला रडवले तर या गोष्टीचे लक्ष राहावे की गेली एक वर्ष झालं कांद्याला भाव नाही.