श्रीगोंदा नगरपरिषदेत पाचव्या दिवसा अखेर नगराध्यक्ष पदासाठी १ तर नगरसेवक पदाचे ७ अर्ज दाखल.
श्रीगोंदा माधव बनसुडे :- श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण थंडीच्या दिवसात तापले असून प्रत्येक पक्ष पूर्ण ताकतीनिशी दंड ठोकुन उभे ठाकले आहेत. भावी इच्छुक उमेदवारांनी गाठी भेटी चालु केल्या असुन ऐन थंडीच्या दिवसात वातावरण तापु लागले असुन राजकिय वातावरण ढवळुन निघत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी अखेर नगराध्यक्ष पदासाठी अनिल तुपे यांचा १ अर्ज दाखल झाला असुन नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक ८ आठ मधुन श्री राजु सिताराम बनसुडे व इतर ६ असे एकुण ७ अर्ज दाखल झाले आहेत.
इच्छुक भावींची यादी मोठी असली तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची यादी अल्प प्रमाणात दिसुन येत असल्याने भावींच्या नजरा पक्षाच्या उमेदवारीकडे लागल्याचे जाणवत आहे.श्रीगोंदा नगरपरिषदेत पहिल्यांदाच चार पॅनल होत असल्याने मागील निवडणुकीपेक्षा यंदाची निवडणुक चुरशीची होणार हे मात्र नक्की . नगराध्यक्ष पद सर्व खुले असले तरी सर्वच पक्षांकडुन महिला उमेदवारांना पसंती दिली जात आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडुन सौं. शुभांगी पोटे , राष्ट्रवादी अजित पवार गटाकडुन सौं. ज्योती खेडकर यांची उमेदवारी जाहीर केली असुन महाविकास आघाडीकडुन सौं. गौरी भोस यांच्या नावाची चर्चा आहे. इतर पॅनल कडुन महिला उमेदवारांना उमेदवारी जाहीर होत असताना भाजपकडुन मात्र अद्याप कोणत्याही नावाची घोषणा होत नसल्याने भाजपाकडुन पुरुष उमेदवार उभा केला जाणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.मात्र भाजप कोणाला उमेदवारी देणार हे येणारा काळच ठरवेल मात्र भाजपने नगराध्यक्षा सह सर्व २२ जागा निवडुन आणण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र मतदार कोणाला कौल देतात हे येणारा काळच ठरवेल.
चौकट
भाजपने जनमत चाचणी घेऊन ज्याला सर्वाधिक पसंती त्यालाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीची मागणी केली आहे त्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरु नये अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यास उमेदवारीसाठी विचार केला जाणार नाही असा फतवा काढल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.🔴🟢🟣🟠
