श्रीगोंद्यात महाविकास आघाडीची जोरदार तयारी नगराध्यक्षपदावर विजयाचा आत्मविश्वास.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
मंगळवार ११ नोहेंबर,२०२५
श्रीगोंदा प्रतिनिधी; अमोल झेंडे श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. खासदार निलेश लंके, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार दादा कळमकर, बाबासाहेब भोस, साजन पाचपुते, प्रशांत ओगले, विजय शेंडे, सुमित बोरुडे, गणेश भोस, निलेश मालपाणी आदी नेते एकत्र येत निवडणुकी संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली.
साजन पाचपुते यांनी सांगितले की, निवडणूक जिंकणार अशीच तयारी आघाडीची सुरु आहे. ज्यांनी विरोधी आमदारकी केली ते आज एकत्र आले आहेत. विरोधकाने वरच्या उमेदवारीचा दसका घेतला आहे, मात्र माविया १००% २२ जागा व नगराध्यक्षा पद जिंकणार आहे. कोणाचा गैरसमज असेल, तर तो दूर व्हावा.
बाबासाहेब भोस यांनी स्पष्ट केले की, आघाडी पॅनेल करणार का नाही अशी शंका काहींना आहे, श्रीगोंदा शहरात खूप सुधारणा झाली आहे. नगरपरिषदेची सत्ता दिल्यास आरोग्य, पाणी, लाईट, गटारलाइन या सर्व सुविधा अधिक सक्षमपणे दिल्या जातील, असे ते म्हणाले.माजी आमदार दादा कळमकर यांनी सांगितले की, आघाडीत मतभेद नाहीत. काही लोक समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्यकर्त्यांनी कंबर कसली तर विजय आपलाच आहे.
आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले की, महा विकास आघाडी पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरली आहे. नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी. गेली २०-३० वर्षे तेच नगरसेवक पुन्हा-पुन्हा येतात. यावेळी २२ नगरसेवक व १ नगराध्यक्षा मिळून २३ जागांवर विजय मिळवणार आहोत. १७ तारखेला अधिकृत यादी जाहीर केली जाईल.
खासदार निलेश लंके यांनी शेवटी म्हटले की, शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून झालेला नाही. त्यामुळे शेतकरी नाराज आहे. निवडणुकीत पैसा नव्हे तर कार्यकर्त्यांची ताकद निर्णायक ठरेल. श्रीगोंद्यात महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष होणार, याबाबत पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
