जिल्हा बँकेचे संचालक व माजी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्रीगोंदा तालुका खादी ग्रामउद्योग संघाच्या व्हा चेअरमनपदी मयुर गोरखे यांची बिनविरोध निवड झाली
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
२१ नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा :खादी ग्रामोद्योग संघाच्या व्हा चेअरमन बबन श्रीराम होते त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पक्षश्रेष्ठीच्या आदेशाने त्यांनी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या व्हा चेअरमन पदी आज झालेल्या निवडी मध्ये माजी आमदार राहुल जगताप यांनी मयूर गोरखे यांची निवड करण्याबाबत सर्व संचालकांना सूचना केल्या त्यानुसार मयूर गोरखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ही निवड यशस्वी करण्यासाठी श्रीगोंदे खादी ग्रामोद्योग चे नेते माजी चेअरमन अंकुश शिंदे, चेअरमन बापूसाहेब गायकवाड आणि महत्त्वाची भूमिका पार पडली. मयूर गोरखे हे राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांचे समर्थक असून लोणी व्यंकनाथ गावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. तर गोरखे यांच्या सूचक म्हणून ज्येष्ठ संचालक वसंतराव सकट तर अनुमोदक चेअरमन बापूसाहेब गायकवाड यांनी दिले. गोरखे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांनीच निवड निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मुंडे यांनी जाहिर केली .
निवड जाहीर होताच माजी आमदार राहुल जगताप, राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा, मनोहर पोटे, यांनी स्वागत केले. या निवडणुकी वेळी संचालक वसंतराव सकट,रमेश कळमकर, नानासाहेब ससाणे,धनंजय लोखंडे,दिलीप तोरडमल,सुनील काळे, रेवती घाडगे, मीरा शिंदे हे उपस्थित होते.
