नगराध्यक्ष पदाकरिता काही उमेदवारी अर्ज माघार तर नगराध्यक्ष पदाकरीता समोरा समोर चार पक्ष निष्ठावंत उमेदवार लढत लढा देणार.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार २१ नोव्हेंबर २०२५,
श्रीगोंदा :नगराध्यक्ष पदाकरीता उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर निवडणुकीचे अंतिम प्रतिमा स्पष्ट झालेल्या आहेत. अनेक इच्छुकांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी चार पक्ष निष्ठावंत उमेदवार लढत लढा देणार असल्याचे स्पष्ट झाले.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्ज माघारीनंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे.
श्रीगोंदा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता चार प्रमुख उमेदवारांमध्ये छक्केपंज्याची, राजकीय लढत. या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे: उमेदवार खेडकर ज्योती सुधीर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), खेतमाळीस सुनिता संतोष भारतीय जनता पक्ष (भाजप), पोटे शुभांगी मनोहर शिवसेना (शिंदे गट), भोस गौरी गणेश महाविकास आघाडी (शरद पवार गट) …
या उमेदवारांनी केली घर परती
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून खालील ९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत प्रमुख चार उमेदवारांना संधी मिळाली आहे.
आळेकर गोरख दशरथ रजिस्टर मळा, श्रीगोंदा.. कोथिंबीर जयश्री बंडू आनंदकर मळा, श्रीगोंदा.. तुपे अनिल दशरथ औटेवाडी, श्रीगोंदा पाचपुते इंद्रायणी प्रतापसिंह पारगाव रोड, श्रीगोंदा.. पोटे आदित्य मनोहर वडाळी रोड माऊली बंगला, पंत नगर, श्रीगोंदा देवी मंदिरा शेजारी, श्रीगोंदा.. बोरुडे समीत सयाजी बनकर मळा, श्रीगोंदा.. बोरुडे सागर मधुकर, पंचाच्या वाड्या शेजारी, श्रीगोंदा पंत नगर, श्रीगोंदा… रासकर भानुदास मारुती दांडेकर मळा, श्रीगोंदा.. हिरनावळे दत्तात्रय रमन वडाळी रोड, रजिस्टर मळा, श्रीगोंदा..
🔴🟢🟣🟠
