सुभद्राबाई दिनकर घोडके यांचे 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार ३ डिसेंबर २०२५
श्रीगोंद प्रतिनिधी: सचिन शिंदे
श्रीगोंदा तालुक्यातील आदरणीय व ज्येष्ठ नागरिक सुभद्राबाई दिनकर घोडके यांचे दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता वृद्धापकाळाने शांतपणे निधन झाले. त्या ९५ वर्षांच्या होत्या.
सुभद्राबाई घोडके या स्वभावाने अत्यंत संयमी, प्रेमळ आणि कुटुंबवत्सल होत्या. संपूर्ण आयुष्य त्यांनी कुटुंब, नातेसंबंध आणि सामाजिक जिव्हाळा जपत व्यतीत केले. गावातील सर्वांनी त्यांना एक आदर्श आणि कर्तव्यदक्ष ज्येष्ठ ज्येष्ठी म्हणून मान दिला होता.
त्यांच्या पश्चात मुलगा दीपक दिनकर घोडके, सुना, नातवंडे असा भक्कम व मोठा परिवार आहे. संपूर्ण घोडके कुटुंबासाठी तसेच त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकासाठी त्यांचे जाणे अत्यंत दुःखदायक आहे.
निधनाची वार्ता समजताच परिसरात शोककळा पसरली आहे. सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घोडके कुटुंबियांना सांत्वनपर संदेश दिले आहेत.
🔴🟢🟠🟣
