शेतकऱ्यांसाठी हमीभावाची ग्वाही; घोगरगावमध्ये नोंदणीची लगबग
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार ४ डिसेंबर २०२५
श्रीगोंदा प्रतिनिधी: अमोल झेंडे
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घोगरगाव येथे सुरू झालेली मका नोंदणी ही फक्त एक प्रशासकीय प्रक्रिया नाही;
तर संकटातून मार्ग शोधणाऱ्या शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई आणि सखुबाई वि. कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या माध्यमातून राज्य सरकारचा २४०० रुपये प्रती क्विंटल हमीभाव शेतकऱ्यांसाठी नव्या आशेची खिडकी उघडतो.
शेतकऱ्यांची वास्तविकता बाजारात भाव नाही, शेतात खर्च जास्त
अवकाळी पाऊस, अनियमित बाजारभाव आणि वाढते उत्पादनखर्च यामुळे शेतकरी हवालदिल आहे. खासगी व्यापारी हव्या तसा भाव सांगतात आणि शेतकऱ्याकडे पर्यायच राहत नाही. अशा वेळी शासनाचा एमएसपी म्हणजे शेतकऱ्याला “तुझं उत्पादन किंमतीला पात्र आहे” असा दिलासा देणारा हात.
घोगरगावची नोंदणी ,शेतकऱ्यांच्या आशेचा मेळावा
घोगरगाव मध्ये जगदंबा डेअरीजवळ सुरू असलेल्या नोंदणी केंद्रावर सकाळपासूनच शेतकऱ्यांची रांग दिसते. कोणी ७/१२ उतारा घेऊन आलेले, कोणी बँक पासबुक, तर कोणी आधार लिंक तपासत आहेत.
हे दृश्य फक्त नोंदणीचं नसून, शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी धडपडणाऱ्या मनाचं चित्र आहे.
➡️पात्रता व कागदपत्रे पण प्रक्रिया पारदर्शक
➡️७/१२ आणि ८अ उतारा
➡️आधार कार्ड
➡️आधार लिंक असलेले बँक पासबुक,मोबाईल नंबर
➡️शेतकऱ्यांना प्रशासनाकडून योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून खास बूथ तयार.बाळासाहेब (काका) उगले, प्रविण डोके आणि वैभव काळे शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं संयमानं उत्तर देत आहेत.
➡️ टीम फक्त नोंदणी करत नाही, तर शेतकऱ्यांचा विश्वास बांधते.
➡️शेतकऱ्यांच्या भावना “सरकारचा भाव मिळाला तर निभेल”
जवळपास सर्व शेतकऱ्यांची एकच भावना आहे
➡️या दराने विक्री झाली तर हंगाम निभेल. बाजारात तर भाव मिळत नाही.”यातून स्पष्ट होतं की एमएसपी ही योजना केवळ कागदोपत्री नाही; ती शेतकऱ्यांच्या जगण्यात उतरणारी योजना आहे.
➡️एमएसपी म्हणजे फक्त योजना नाही, शेतकऱ्याची सन्मानाची रेषाजेव्हा बाजारभाव गडगडतो, तेव्हा शेतकरीचं उत्पादनचं नव्हे तर त्याचं मनोबलही कोसळतं. अशा वेळी शासनाची हमीभाव योजना म्हणजे अस्मितेचा आधार.
➡️शेतकऱ्याला बाजाराच्या दयेवर सोडून दिलं जाऊ नये हीच या योजनेची ताकद.
➡️घोगरगावमधील नोंदणी केंद्र हे त्यांच्या जगण्याच्या लढाईत उभं असलेलं एक सुरक्षित वचन आहे.शेवटचं शब्द प्रत्येक शेतकऱ्याने पुढे येणं गरजेचं
➡️नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.
➡️शेतकऱ्यांनी ही संधी वाया न घालवता लवकरात लवकर आपली नोंदणी करावी, कारण एमएसपी हा फक्त भाव नाही.
➡️तो शेतकऱ्याच्या घामाला मिळणाऱ्या सन्मानाचा दर आहे.
➡️आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली असून उर्वरित शेतकऱ्यांनी शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
