बिबट्याच्या हल्ल्याच्या भितीने म्हातारं पिंपरी चे शेतकरी भय भीत तहसीलदार यांना निवेदन.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार ५ डिसेंबर २०२५
श्रीगोंदा प्रतिनिधी :बिबट्याच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी रात्री शेतात जाण्यास घाबरत आहेत, त्यामुळे त्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी जोर धरत आहे.
सध्या श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारं पिंपरी येथे बिबट्याची दहशत वाढली असून बिबट्या दिसत असल्याने म्हातारं पिंपरी गावची वीजपुरवठा ही रात्रपाळी असून रात्रीचे भरणे करणे सर्व शेतकऱ्यांना अवघड झाले आहे.सगळीकडे भीतीचे वातावरण झालेले आहे. तरी वीज ही दिवस पाळी कायम करण्यात यावी त्या संदर्भात गुरुवार ४ डिसेंबर २०२५ रोजी मा. तहसीलदार साहेब व विधुत कार्यकारी अभियंता महामंडळ यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी म्हातार पिंपरी गावचे सरपंच -ज्योत्स्ना देविदास हिरडे उपसरपंच -रमेश भाऊ घोडके स्वस्त धान्य दुकानदार अध्यक्ष -सतिष हिरडे संदीप हिरडे, लाला शिरसाठ, रमजान शेख, जग्गनाथ झिझाडे, मंचल शिरसाठ, शरद शिंदे,विक्रम शिरसाठ, नितीन हिरडे, सुभाष हिरडे,बाळासाहेब सूर्यवंशी निलेश कुरूमकर,मनोज लोखंडे, अभिजित गोसावी सर्व शेतकरी, उपस्थित होते.
🔴🟢🟠🟣
