आमदार खासदार करणार एम आय डी सी! झाली तोंडी उत्तरे
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार १८ डिसेंबर २०२५
अहिल्यानगर: तालुक्यातील श्रीगोंदा, कर्जत,व पाथर्डी येथील होतकरू तरुण नोकरीच्या शोधात मुबई पूणे हैदराबाद बेंगळूर व गुजरात येथे जात नोकरी शोधूनही नोकरी मिळेना या विषयावर राजकारण का होत नाही याची चर्चा हि राजकारणात गप्पा करून संपवली जाते. तर कधी रोड पाणी,व वीज आधारित कामकाजावरती कायम सुरू असते. अनेक वर्षापासून एम आय डी सी हा प्रश्न लांबणीवर यांची उत्तरे सरकार एक तर्फी बनले की पाहिजे अशी उत्तरे दिली.आता पुन्हा निवडून द्या म्हणजे कामे करू अशी उत्तरे व भूमिका निभावणारे अभिनेते बनले आमदार, खासदार
सध्या श्रीगोंदा शहरास एम आय डी सी मंजूर झाली आहे तर ती कामे सुरू का होऊ शकली नाहीत.हे बी जी पी पक्षाने स्पष्ट उत्तर दिले पाहिजे या रोजगार निर्मिती मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठ पुरावे देऊन हि एम आय डी सी कामकाज लांबणीवर अद्याप कशासाठी तुम्ही तर पंचायत राज उपक्रम योजना राबविण्या साठी सांगितले आहे मग कामे सुरू का नाहीत याच बाबतीत अधिकारी व श्रीगोंदा कर्जत तालुक्याचे आमदार यांचे कर्तव्य नाही का श्रीगोंदा शहराचा विकास पूर्ण थांबलेला आहे. श्रीगोंद्यातील सर्व कॉलेज विद्यार्थांनी भरगच्च प्रवेश घेतला जातो.
शिक्षणासाठी फी तर वसूल केली जाते मग या प्रश्नावरती मार्ग अद्याप मिळाला नाही का रोजगार निर्मिती करून देण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील आमदार व यांनी काय केले याची माहिती दिली तर श्रीगोंदा तालुक्यातील नोकरी साठी फिरणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांचा आपल्याला आहे. आपण शाळा कॉलेज चालवत मुलांना शिक्षणे देतात तर नोकरी का नाही उपस्थित झाला आहे.अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी नसल्याने परत घरपोहच होतात.
राजकारण हे फक्त स्वतःची मतलबे बनून राहिले आहेत. कोण कोणाच्या पार्टीत तर कोण कोणाच्या पक्षात प्रवेश करतो याचे उत्तर असे स्वतःचा फायदा पाहतो.मग या गरीब नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या मुद्यावर काम होतच नाही तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू हेच चालत आले असल्याने श्रीगोंदे तालुक्यातील सुशिक्षित मुलांना नोकरी नसल्याने पान टपरी, दारू विक्री, हॉटेल मालक बनावे लागते परंतु या धंद्यांना सुद्धा कालांतरान बंद करावे लागते. मुख्य कारण येथिल जनतेकडे पैसे व नोकरी नसल्याने व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे.
कितेक वर्षापासून एम आय डी सी मंजूर आहे पण कंपन्या ह्या गुजरात मध्ये स्थलांतरित होत चालल्या आहेत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी महाराष्ट्रात एम आय डी सी आणाव्यात लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला का महाराष्ट्रातील युवकांना शेवट गांजा दारू धाबे तसेच चहाची दुकाने उघडून बसावे लागले आहे. तुम्ही आमदार खासदार स्वतः करोडपती होऊन अयशी मधे हिवाळी अधिवेशनात तर रोजगार निर्मिती हि महाराष्ट्र नसल्याने महाराष्ट्रातील व महाराष्ट्रातील सुशिक्षित मुलांना दारिद्र्याचे करण्यात बनत चालले हे. भारतातील बाकीच्या राज्यात सर्वाधिक जोरदार हा तेथील आमदारांनी लावल्याने बाकीच्या राज्यात नोकरी मिळत आहे
अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा सर्व कंपन्यांकडे पुरेशा कामगार जागा नाहीत तसेच सर्व कंपन्या छोट्या आहेत तर काही बंद पडलेल्या अवस्थेत काही कंपन्या दुसऱ्या राज्यात स्थलांतर केले आहे. जिल्ह्याला आता नवीन नाव देण्यात आले आहे. अहमदनगर हे अहिल्यानगर शहराचे नाव बदलून गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. नोकरी व रोजगार मिळत नाही लोकांना काम पाहिजे अन्यथा हा अहिल्यानगर जिल्हा बीड प्रमाणे ऊस तोड कामगार बनण्यास वेळ लागणार नाही हे तितकेच खरे.
जरी वडगाव गुप्ता, अहमदनगर येथे ६०० एकर जमीन फेज २ साठी हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला असून शिर्डी येथील शेती महामंडळाच्या ५०० एकर जमिनीवर दुसरी एमआयडीसीस तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे मग श्रीगोंदा तालुक्यातील एम आय डी सी मंजूर चे काय व हि नवीन एम आय डी सी मंजूर झाली तर पूर्ण होत का नाही अशाच मंजुऱ्या सर्वत्र असून हि कामे रेंगाळत चालली आहेत.
तरी अहिल्यानगर खासदार व या जिल्ह्यातील तालुक्यांचे आमदार यांनी या विषयावर चर्चा हि हिवाळी अधिवेशनात हवी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालावी हि मागणी प्रत्येक सुशिक्षित शेतकऱ्याच्या मुलाची आहे.
🔴🟢🟠🟣
