सारोळा सोमवंशीची ऐतिहासिक गरुडझेप! मा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी साहेब जि.प. अहिल्यानगर जिल्हा तील ग्रा.प.करवसुली बाबत उपक्रम यशस्वी .. ….
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार १ जानेवारी २०२६
श्रीगोंदा प्रतिनिधी:मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत सारोळा सोमवंशी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर यांनी प्रशासन, लोकसहभाग आणि नेतृत्व यांचा आदर्श संगम घडवत श्रीगोंदा तालुक्याच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंद होईल अशी कामगिरी केली आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत घरपट्टी व पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली पूर्ण करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्र शासनाने मागील थकबाकीवर ५०% सूट देणाऱ्या अभियानाची अंतिम मुदत ३१ डिसेंबर निश्चित केली होती. या संधीचे रूपांतर यशात करत सारोळा सोमवंशी ग्रामपंचायतीने केवळ कर वसुलीच नाही तर शिस्तबद्ध प्रशासन, पारदर्शक कारभार आणि जागरूक नागरिकत्वाचे जिवंत उदाहरण संपूर्ण तालुक्यासमोर उभे केले आहे.
ही दैदीप्यमान कामगिरी विद्यमान सरपंच सौ.उज्वला राहुल आढाव यांच्या दूरदृष्टीपूर्ण, गतिमान आणि लोकाभिमुख नेतृत्वाखाली साकार झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच श्री संदीप ननवरे, ग्रामपंचायत सदस्य श्री अंजाबापू कवाष्टे, सौ. शितल लोंढे, सौ. सुप्रिया आढाव, सौ. सविता नवले, सौ. मेहबूबी शेख यांनी एकदिलाने काम करत ग्रामविकासाला नवी दिशा दिली. यामध्ये श्री. राहुल आढाव यांची खंबीर साथ लाभली.
प्रशासकीय बाजू सांभाळताना ग्रामपंचायत अधिकारी श्री स्वप्निल आंबेटकर यांनी कार्यक्षम नियोजन, सततचा पाठपुरावा आणि जनजागृतीवर भर दिला. प्रत्यक्ष कामाच्या पातळीवर ग्रामपंचायत शिपाई श्री भाऊसाहेब लोंढे, पाणीपुरवठा कर्मचारी श्री सुरेश आढाव, श्री चैतन्य आढाव, संगणक परिचालक श्री गणेश आढाव यांनी अथक परिश्रम घेत गावाला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
या संपूर्ण प्रक्रियेत जि.प. ग्रा.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ साहेब. श्रीगोंदा तालुका गटविकास अधिकारी श्रीमती राणीताई फराटे व ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्रीमती हराळ मॅडम यांचे मोलाचे, प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.
आज सारोळा सोमवंशी हे गाव “आदर्श ग्रामपंचायत” या संकल्पनेचा जिवंत आदर्श ठरत असून, एकजूट, नेतृत्व आणि लोकसहभाग याच्या बळावर श्रीगोंदा तालुक्यातील इतर गावांसाठी प्रेरणास्तंभ बनले आहे. लवकरच सारोळा सोमवंशीचे नाव तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात आदर्श गाव म्हणून गौरवाने घेतले जाईल, यात शंका नाही.
चौकटीत
घरपट्टी व पाणीपट्टी कर भरल्यावर करधारकांना कचराकुंडीचे वाटप करण्यात आले.
🔴🟢🟠🟣
