टाकळी कडेवळीत आपलं गाव आपली जबाबदारी या उपक्रमाचे उद्घाटन समारंभ.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शुक्रवार २ डिसेंबर २०२५
श्रीगोंदा प्रतिनिधी:टाकळी कडेवळीत गावकऱ्यांसह मोहिम आपण गाव व गावपरिसर स्वच्छता मोहीम करूया श्री तुषार किसनराव नवले यांनी केली. संकल्पना आपल गाव आपली जबाबदारी उपक्रम चालू करण्यासाठी उद्घाटन व आठवड्यातील दर रविवारी गावासाठी फक्त २ तास या उपक्रमाचे गुरूवार दि १ जानेवारी २०२६ या नवीन वर्षा च्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या मुर्ती चे पुजन व महाआरती करून संकल्पाना सुरूवात होईल असे तुषार नवले यांनी म्हटले आहे.
गाडगे महाराजां प्रमाणे आपण गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावून रोगराईचा बीमोड करू तसेच ओल्या कचऱ्याने होणारे डास हे रोगराईला आमंत्रित करणारे ठरतात. तसेच डेंग्यू मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या संबंधित रोगाने गावातील नागरिक सतत ग्रस्त राहतात. या मध्ये दवाखान्यांमध्ये हजारो लाखो रुपये जाऊनही चिकनगुनिया सारख्या आजाराने हात पाय हे कायम चमकत व उठता बसता येत नाही अशा बऱ्याचश्या रोगांचा त्रास होऊ नये व गावातील प्रत्येक चौक स्वच्छ व सुशोभित रहावा यासाठी सर्व गावकरी एकत्र येऊन स्वच्छतेची मोहीम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वच्छतेचे वार:पहिला रविवार ४ जानेवारी २०२६ ग्रामदैवत बैरागी बाबा मंदिर व परिसर दुसरा रविवार ११ जानेवारी २०२६ हनुमान मंदिर व परिसर भैरवनाथ मंदिर व परिसर तिसरा रविवार १८ जानेवारी २०२६ चौथा रविवार २५ जानेवारी २०२६ तुकाई माता मंदिर व परिसर दर रविवारी सकाळी ०८ ते १० हा उपक्रम होईल. ठिकाण :-ग्रामपंचायत कार्यालय समोर टाकळी कडेवळीत गुरुवार १ जानेवारी सकाळी ९ वाजता सुरू होणार.