तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धेत काव्या ढवळे प्रथम.
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
शनिवार ३ जानेवारी २०२६
श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा नुकत्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले श्रीगोंदा या ठिकाणी उत्साहात संपन्न झाल्या.
स्पर्धेमध्ये ढोकराई फाटा येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता २ ची विद्यार्थिनी कु.काव्या कैलास ढवळे हिने संत गाडगे महाराज यांचे वेशभूषा सादर करून उपस्थितांची मने जिंकणारे विचार व्यक्त करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
काव्या हिला सर्व ढोकराई शाळेतील शिक्षक व सौ.साबळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल काव्याचे शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे साहेब केंद्रप्रमुख श्री.भुकन सर, मुख्याध्यापक सौ.संगीता लगड मॅडम यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
🔴🟢🟠🟣
