विभागीय वकृत्व स्पर्धेत महाराजा कॉलेजच्या साक्षी डफळ चे यश
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार १४ जानेवारी २०२६
तालुका प्रतिनिधी:रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग व कर्मवीर विद्या प्रबोधनी च्या वतीने अहिल्यानगर येथे घेण्यात आलेल्या उत्तर विभागीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील इयत्ता अकरावी कॉमर्स मधील विद्यार्थिनी कुमारी साक्षी मारुती डफळ हिने उत्कृष्ट प्रदर्शन करत उत्तर विभागांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे.
त्याबद्दल तिचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. तिच्या यशासाठी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख श्रीकांत थोरात सर वकृत्व विभाग प्रमुख पटारे सर, मांडे सर, बांद्रे मॅडम, दरेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. जूनियर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झीटे प्राचार्य डॉ. महादेव जरे साहेब यांनी साक्षीचे कौतुक करून तिला या यशासाठी व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यशस्वी विद्यार्थिनी साक्षी हिचे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माजी आ. बबनराव पाचपुते, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मा. बाबासाहेब भोस, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी आ. राहुल जगताप, मा. महावीर पटवा यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
🔴🟢🟠🟣
