उखलगावमधील शाळा व अंगणवाड्या १०० टक्के सौरऊर्जेवर कार्यान्वित
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
बुधवार २१ जानेवारी २०२६
श्रीगोंदा प्रतिनिधी:- उखलगाव गावाने शैक्षणिक व पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून गावातील सर्व शाळा व अंगणवाड्या आता १०० टक्के सौरऊर्जेवर कार्यान्वित झाल्या आहेत. या उपक्रमामुळे वीजपुरवठ्यातील अडथळे दूर होऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला सातत्य मिळणार आहे.
Burckhardt Compression India Pvt. Ltd. या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत चिराग फाउंडेशन यांच्या माध्यमातून श्री खंडेश्वर माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच उखलगाव व वाळके मळा येथील अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा प्रणाली यशस्वीपणे बसविण्यात आली आहे. या सर्व संस्था आता पूर्णतः सौरऊर्जेवर चालू असून पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाला चालना मिळाली आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी श्री. गणेश लक्ष्मण लाकुडझोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळा व्यवस्थापन समिती सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार व्यक्त केले असून ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
या उपक्रमाला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मा. राणी फराटे मॅडम तसेच विस्तार अधिकारी यादव साहेब यांनी भेट देऊन कौतुक केले. त्यांनी उखलगाव ग्रामपंचायतीच्या नियोजनबद्ध, पारदर्शक व लोकसहभागातून राबविलेल्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या एकजुटीमुळे उखलगाव ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना स्पर्धेत आदर्श व सक्षम ग्रामपंचायत म्हणून पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
🔴🟢🟠🟣
