पोलिस पूर्व भरतीचे ट्रेनिंग देण्याच्या नावाखाली मुस्लिम युवकाने हिंदु मुलींवर केला अत्याचार करून जबरदस्तीने केला गर्भपात
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
गुरुवार ५ फेब्रुवारी २०२५
श्रीगोंदा :वार्ताहर शिंदे
पुणे जिल्ह्यातील एक युवती पोलीस दलात आपले करिअर घडवण्यासाठी श्रीगोंदा येथील रनर्स क्लब अकॅडमीमध्ये भरती झाल्यावर अकॅडमी चालकाने तिच्याशी जवळीक साधून वारंवार बलात्कार करत जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यातील एक युवती उच्च शिक्षण घेण्यासाठी महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा या ठिकाणी आली असता तिला पोलीस भरती मध्ये करिअर घडवायचे असल्यामुळे तिने शिक्षणाबरोबर श्रीगोंद्यातील रनर्स क्लब अकॅडमी जॉइन केली. मात्र डिसेंबर २०२४ मध्ये पोलीस भरती ग्राउंडची तयारी करत असताना तिचा अचानक पाय लचकला याबाबत तिने अकॅडमी चालक जावेद शेख यांना विचारणा केली असता त्याने दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर ग्राउंड वर बोलावून घेऊन पायाला ट्रेचिंग करण्याच्या बहाण्याने पीडितेच्या पायांना, मांड्यांना हात लावू लागला त्यावेळेस फिर्यादीने आरोपी जावेद शेख यांना प्रतिकार केला. त्यावेळी त्याने तिला सांगितले की मी तुझा प्रशिक्षक आहे मला हात लावावाच लागतो असे म्हणत फिर्यादीस जवळीक साधून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने इच्छेविरुद्ध संबंध केले.
याबाबत कोणालाही काही एक सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने वेळोवेळी इच्छेविरुद्ध ग्राऊंडवर व त्याच्या राहत्या घरी नेऊन अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले त्यातून जानेवारी २०२५ मध्ये फिर्यादीच्या पोटात अचानक दुखू लागल्यानंतर ती उपचारकामी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात गेली असता ती गर्भवती असल्याचे तिला समजले. त्यावेळी तिने आरोपी जावेद शेख यास गर्भवती असल्याचे सांगितले. त्यावेळी जावेद व त्याचा मित्र हे तिच्या रूमवर गर्भपाताच्या गोळ्या घेऊन जबरदस्तीने दिल्या त्याने गर्भपात झाला त्यावेळेस फिर्यादीने जावेद शेख यास लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने साफ नकार दिला व मला गजवा- ए- हिंद म्हणाला त्यानंतर ऑक्टोबर २०२५ पर्यंत जीवे मारण्याची धमकी देत वारंवार जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर त्याच्या होणाऱ्या वारंवार त्रासाला कंटाळून पीडितीने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जावेद शेख व त्याचा मित्र यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चौकट:- सकल हिंदु समाजाच्या वतीने श्रीगोंदा पोलिसांना निवेदन पोलीस पूर्व भरतीच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या युवतीवर बलात्कार करत जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ जेरबंद करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदु समाज यांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले.
टीप: बातमी कव्हर करणारे वार्ताहर सचिन शिंदे
बातमीतील मुद्दे: जवळीक साधणे, इच्छेविरुद्ध जबरी, जबरदस्तीने गर्भपात, अपमानास्पद वाक्य:मला गजवा- ए- हिंद , लग्नास नकार
नोंदणी स्थळ : श्रीगोंदा पोलिस स्टेशन
➡️सकल हिंदु समाजाच्या वतीने श्रीगोंदा मुख्य अधिक्षक किरण शिंदे यांच्या हाती निवेदन देण्यात आले.
